महात्मा ज्योतीबा फुले जयंती ग्रामोन्नती प्रतिष्ठाण व्दारे साजरी
*नागपूर* कन्हान : – ग्रामोन्नती प्रतिष्ठाण नागपुर, मुख्य कार्यालय कन्हान-पिपरी व्दारे थोर समाज सुधारक शेतक-यांचे कैवारी आणि स्त्री शिक्षणाचे उद्गाते महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती कोविड-१९ च्या नियमाचे पालन करून थाटात साजरी करण्यात आली.
रविवार (दि.११) एप्रिल ला ग्रामोन्नती प्रतिष्ठाण चे अध्यक्ष व रामटेक क्षेत्राचे माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव व क्रिडा शिक्षक माधवजी काठोके यांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नगरप्रकिनिधीनी पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या समाज सुधारक मौलिक कार्यावर प्रकाश टाकुन कन्हान शहरात कोरोना रूग्णाची वाढती चिंता जनक संख्या रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन कन्हान शहरात औषधाची फवारणीने सॅनिटाईजेशन करण्याकरिता नियोजन करून महात्मा ज्योतीबा फुले जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी मोतीराम रहाटे, दिलीप राईकवार, महेश काकडे , अजय ठाकरे, चंद्रशेखर कळमदार, गोविंद जुनघरे, रवि कोतपल्लीवार, सुतेश मारबते, प्रमोद निमजे, भुषण इंगोले, निलेश गाढवे, मिलींद पापडकर, कृणाल संतापे, ऋृषभ दुधपचारे आदी उपस्थित होते.
ग्राम पंचायत टेकाडी (को.ख)
ग्राम पंचायत टेकाडी (को.ख) च्या सरपंचा सुनिता मेश्राम यांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी ग्राप सदस्या सुरेखा कांबळे, सिंधुताई सातपैसे, मायाबाई मनगटे, सदस्य अरूण सुर्यवंशी, विनोद इनवाते, कर्म चारी सुनीता वानखेडे, मनोज मोहाडे, सुधाकर वासाडे उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535