मंगळवेढ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांची बदली, राजश्री पाटील यांची नियुक्ती
Summary
मंगळवेढ्याचे उपविभागिय पोलीस राजश्री संभाजीराव पाटील यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने केली उपविभागिय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांची अन्यत्र बदली करण्यात आली असून तीन महिने सेवानिवृत्ती राहीले असताना ही बदली झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने ७ परिविक्षाधीन पोलिस उपअधिक्षक […]
मंगळवेढ्याचे उपविभागिय पोलीस राजश्री संभाजीराव पाटील यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने केली उपविभागिय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांची अन्यत्र बदली करण्यात आली असून तीन महिने सेवानिवृत्ती राहीले असताना ही बदली झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने ७ परिविक्षाधीन पोलिस उपअधिक्षक या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यात मंगळवेढ्याचे उपविभागिय पोलीस अधिकारी म्हणून राजश्री संभाजीराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दत्तात्रय पाटील हे २७ फेब्रुवारी २०१९ मध्ये मंगळवेढ्यात रूजू झाले होते.त्यांच्या या दोन वर्षाच्या कारकीर्दीत २५ मोटारसायकल चोरीचा तपास लावण्यात यश मिळाले होते.
दि.३१ मे २०२१ रोजी ते सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांची त्यापुर्वीच अन्यत्र अधिकारी बदली झाली आहे.
सध्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक लागणार असल्याच्या पार्श्वभूमीवर बदली प्रक्रिया झाल्याची चर्चा नागरिकामधून केली जात आहे.
दरम्यान पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या रूपाने सोलापूर जिल्हयाला पहिल्यांदांच महिला पोलिस अधिक्षक तर मंगळवेढा उपविभागीय पोलिस कार्यालयाच्या स्थापनेपासून राजश्री पाटील आली यांच्या रूपाने पहिल्यांदाच महिला पोलिस उपअधिक्षक लाभल्याने पोलिस खात्यात आता महिला राज आल्याची चर्चाही होत आहे.
राज्य पोलीस दलातील ‘या’ पोलीस उप अधीक्षक; सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या
राज्यातील पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश काल गृहविभागाने काढले आहेत. गृहमंत्रालयाने सात पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत.
बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात नवीन नियुक्तीचे ठिकाण
1. अमोल नारायण ठाकूर – ( उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी उपविभाग, जिल्हा गडचिरोली.
2. निलेश श्रीराम पालवे – (सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर शहर)
3. सचिन धोंडीबा थोरबोले – (सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर शहर)
4. प्रमिल प्रफुल्ल गिल्डा – (उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली)
5. अश्विनी रामदास जगताप – ( सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर शहर)
6. राजश्री संभाजीराव पाटील – (उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा उपविभाग, जिल्हा सोलापूर)
7. सुनिल सदाशिव साळुंखे – (उपविभागीय पोलीस अधिकारी, आर्वी उपविभाग, जिल्हा विर्धा)
तसेच दत्तात्रय आनंदराव पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा उपविभाग जिल्हा सोलापूर यांची बदली करण्यात आली आहे.मात्र त्यांच्या बदलीचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे आदेशात म्हंटले आहे
सचिन सावंत
मंगळवेढा
(पश्चिम महाराष्ट्र)
9370342750