BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

“ब्राम्हणी” विचारसरणीचा विषय निघताच ब्राम्हणेतरांनाच पोटशूळ कां उठतो..? ? से. नि. पोलीस अधीक्षक अनंत थोरात.

Summary

नागपूर प्रतिनिधी ब्राम्हण्या विषयी न बोलणे म्हणजे सध्या अस्तित्वात असलेली समग्र सामाजिक पध्दती आणि परिस्थिती बदलण्यात भ्याडपणा दाखविणे ….याबाबत आपले विचार लपविणे,व्यक्त न करणे म्हणजे ही परिस्थिती उलथून टाकण्यास हाक देणार्‍यांना साद न देणेच होय !! जातीयवादाचा संपूर्ण इतिहास हा […]

नागपूर प्रतिनिधी
ब्राम्हण्या विषयी न बोलणे म्हणजे सध्या अस्तित्वात असलेली समग्र सामाजिक पध्दती आणि परिस्थिती बदलण्यात भ्याडपणा दाखविणे ….याबाबत आपले विचार लपविणे,व्यक्त न करणे म्हणजे ही परिस्थिती उलथून टाकण्यास हाक देणार्‍यांना साद न देणेच होय !!
जातीयवादाचा संपूर्ण इतिहास हा वंचना, अन्याय-अत्याचार, शोषण आणि संघर्षाचा आहे.
आपण आज अशा टप्प्यावर आहोत जेथे शूद्र, दलित समाज या जोखडातून मुक्त होण्यास संघर्ष करण्यास तयार झाला आहे. पूर्वीही हा संत, महात्म्यांच्या व्यथेचा विषय होता. “बहुजन हिताय बहुजन सुखाय” , “जो जे वांछिल तो ते लाहो,” पर्यंतचे अनेकांचे उदात्त विचार “जातीवंतांनी” मागे टाकलेले आहेत. त्यामुळे अन्याय, अत्याचार ,शोषण जुलूम जोपासत…….. संधी, समता स्वातंत्र्य, बंधुता यांना तिलांजली देत निर्माण झालेल्या समाजाच्या “घडी” त फरक पडलेला नाही..” समताधिष्ठित आदर्श समाज” हा स्वप्नातला विषय वाटू लागलाय! जातीवर्गविहीन समाजाची निर्मिती ही काही बुद्धिवंतांनी किंवा संत महात्म्यांनी सांगितलेली आदर्श समाज व्यवस्था नव्हे….तर तो मानव समाजाच्या विकासाचा पुढचा अनिवार्य टप्पा आहे.. हे स्थित्यंतर योगायोगाने घडणारे नाही. जातीअंत, समता, बंधुता, संधीची उपलब्धता यातून हे सामाजिक संबंध निश्चित झाले पाहिजेत. दुर्दैवाने ह्या बाबी राजकारणापर्यंत मर्यादित होतांना दिसत आहेत. असे स्पष्ट मत सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक अनंत थोरात यांनी व्यक्त केले आहे.
उच्चवर्णीयांना मात्र त्यांच्या श्रेष्ठत्वात समाजातल्या खालच्या वर्गाची लुडबुड अजिबात मान्य नसते.तो खुर्चीत तर मागास जमिनीवर…तो अशिक्षित आणि मागास उच्चशिक्षित….तरी श्रेष्ठत्वाचा अहंकार त्यांच्या रक्तातच….वयाने लहान असला तरी त्याला ‘नमस्कार घालावा,…मागास,दलिताने त्याच्या वाड्यासमोरुन जातांना सायकलवरुन उतरुन जावे, पायातले काढून हातात धरुन जावे…वरातीत वर मुलगा घोड्यावर बसला तर त्यांची खैर नाही,,कोणत्या सार्वजनिक कार्यात राबराब राबले तरी प्रसाद शेवटल्या पंगतीत ….कुठं फेडणार ही पापं???? हो!! मनुवाद्यांचा हाच तर धर्म!!! ….तुम्ही म्हणाल…असं तर कुठंच नाही!!… . देशातल्या साठ सत्तर टक्के गांवखेड्यांत याचा अंश अजूनही झिरपलेला दिसेल!! ……धर्म, जात,दैववाद, व्यक्तीवाद, अधिकार, संकुचित स्वार्थ, याचे संस्कार समाजावर पिढ्यान् पिढ्या होत आले आहेत. आणि ते शिक्षणव्यवस्था, उद्योग, प्रसारमाध्यमे,यांच्या माध्यमातून अधिक बळकट करण्याचे कार्य बिनबोभाट सुरुच आहे…ते बंद झाले पाहिजे.
वेदोत्तर काळात ब्राम्हण, क्षत्रिय हे उच्चवर्ण आणि वैश्य, शूद्र हे नीचवर्ण अशी विभागणी केली आहे. उद्योग, शिक्षण,शासन, स्ंस्कृती यांचा मक्ता उच्चवर्णीयांचा, आणि श्रम, सेवा,गुलामी,दारिद्र्य ह्याची वाटणी नीच , शुद्र जातीला….ही परंपरा, विभागणी कायम ठेवणे..ही ब्राम्हण संस्कृती….. त्यातही धर्म, रुढी,अध्यात्माचे अधिष्ठान…कर्म, पाप-पूण्य,पुनर्जन्म,स्वर्ग-नरक,जन्मापासून मृत्यूपर्यंत नाना धार्मिक संस्कार यांचे जोखड,यात समाजाला जखडून ठेवण्यात ब्राम्हण कमालीचा यशस्वी झाला आहे. जातीव्यवस्थेचा हा इमला अजूनही अबाधित आहे..
भारतात बौद्ध, जैन, शैव, वैष्णव,मुस्लिम ख्रिश्चन, अशा निरनिराळ्या धर्माचे व पंथांचे राज्यकर्ते झालेत. त्यांच्या धर्मात जातीव्यवस्थेला स्थान नव्हते. परंतु, त्याचेपैकी कुणी जातीव्यवस्थेविरुध्द, शुद्रांवरील अन्याय अत्याचाराविरुध्द पाऊल उचलले नाही…त्यामुळे जात उतरंड अजून बळकट होत गेली.
स्वातंत्र्योत्तर काळात सत्तेतील भागीदारी ही भांडवलदार,जमीनदार,सरंजामदार,परंपरागत घराणी, यांचीच मक्तेदारी आहे..राजकारणात धर्म, जात यांचा उघड वापर सुरु आहे.. भांडवलदार प्रसारमाध्यमे धर्मांधता, जातीवाद,जातीभेद, अंधश्रद्धा यांना पोसणारा प्रचार करीत आहेत…सामाजिक न्याय हा राजकारणात फक्त परवलीचा शब्द झाला आहे…
जातीभेदभाव, अन्याय, अत्याचार यांचेविरुध्द संघर्ष करण्याची जाणीव अलिकडच्या काळात दलित, मागास वर्गात निर्माण झाली आहे. आपल्या हक्कांविषयी जागृती…., शिक्षण, शासन वगैरेत न्याय्य वाटा ही दलित मागास जमात मागायला लागली आहे… या जातीमधिल पुरोगामी प्रवाह बळकट होऊ लागले आहेत…
.दलित व मागास जातीजमाती हा समाज एकसंघ होऊ नये याची व्यवस्था ब्राम्हणी समाजाने करुन ठेवली आहे..वंचित जातीजमातींना शासनकर्ते बनविणे म्हणजे ‘मनू’ला डोक्यावर उभे करण्यासारखे आहे..
जे कदापि शक्य नाही… मनूवाद्यांविरुद्ध काही प्रतिक्रिया, टिपणी केली की ब्राम्हणांना नाही,तर त्यांच्या हितचिंतकांनाच ती जास्त बोचते….
कारण…..ब्राम्हणाशिवाय , जन्मापासून मृत्यू पर्यंत त्यांचे पानच हालत नाही!!!!महाराष्ट्रात तर कहरच आहे….पूजेचे विधीच शेकडो आहेत….कोणत्याही गोष्टीला ब्राम्हण पूजा सांगतोच….आणि विधी करणारे पंडीत हमखास उत्तर भारतीय !!! तो अशिक्षित, अल्पशिक्षित,व्यभिचारी, संस्कृत श्लोक -स्तोत्रांचे उच्चार अशुध्द आणि मोडतोड केलेले असले तरी त्याची विद्वत्ता यांना शिरसावंद्य…त्याच्या पाखंडी पांडित्याचीही पूजा…..शेवटी त्याच्या पायावर सर्व कुटुंबाचे डोके ठेवून झाल्यावर धन-धान्य-वस्त्रादिंचे स्वतःच्या ऐपतीपेक्षा जास्त दान….!! प्रतिष्ठेचा प्रश्न असतो ना !!!
आर्थिक दृष्ट्या थोडी संपन्नता आली की काही मागास जातीचे,ज्यांना ब्राम्हणी धर्मात कुठेही जवळ करण्यात आले नव्हते,,, परीघाबाहेर होते, ज्यांच्या बाप,दादा,पूर्वजांनी कधी पूजापाठ पाहिले नव्हते,,,तेही आता या थोतांडाच्या मागे लागून प्रतिष्ठेचा आव आणू पहात आहेत….इकडे जात-वर्ण विद्वेशाचे असहनीय चटके भोगल्यावरही ,मागास जाती जमातीच्या सवलती भोगत ब्राम्हणी विचारांची मखलाशी करण्यात ते स्वतःला कुठेही कमी पडू देतांना दिसत नाहीत……आम्ही मनुस्मृती जाळली, गाडली….हे मनू ला जोजवत आहेत….असे परखड विचार आपल्या लेखनातून
अनंत थोरात पोलीसआहेत अधीक्षक(सेनि)नागपूर यांनी व्यक्त केले आहेत.

चक्रधर मेश्राम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *