BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

बिग ब्रेकिंग खून : चंद्रपूर झाले खुनपूर : 26 वर्षीय युवकाचीधारदार शस्त्राने वार करीत हत्या

Summary

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील जूनोना रस्त्यावरील विक्तूबाबा मठाजवळ 26 वर्षीय सोनू चांदेकर नामक युवकाची धारदार शस्त्राने वार करीत हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने सततच्या खुनांमुळे जिल्हा हादरतोय. ही घटना 2 मार्चला रात्री 10 वाजेदरम्यान घडली असून अचानक अज्ञातांनी […]

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील जूनोना रस्त्यावरील विक्तूबाबा मठाजवळ 26 वर्षीय सोनू चांदेकर नामक युवकाची धारदार शस्त्राने वार करीत हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने सततच्या खुनांमुळे जिल्हा हादरतोय.

ही घटना 2 मार्चला रात्री 10 वाजेदरम्यान घडली असून अचानक अज्ञातांनी सोनु चांदेकर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करीत ठार केले आणि आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला, दरम्यान घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस स्टेशन ठाणेदार रोशन यादव आपल्या चमुसह घटनास्थळी पोहचले. सोनू च्या हत्येमागचं कारण काय? आरोपी कोण? याबाबत रामनगर पोलीस तपास करीत आहे.

जिल्ह्यात खून करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून संघटित गुन्हेगारीतून कट रचून खून करण्याचे सत्र सुरूच आहे काही महिन्यापूर्वी सूरज बहुरीया व राजू यादव यांचा बंदुकीने खून यार शुभम फुटाणे याचा धारदार शस्त्राने खून समोर आल्याने चंद्रपूर जिल्ह्यात संघटित गुन्हेगारीवर आळा कसा बसेल? यावर पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा चंद्रपूर जिल्हा बिहार राज्यातील गुंडगिरीचा जिल्हा बनेल अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांत उमटत आहे.

विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *