प्रहार जनशक्ती पक्षा व्दारे मोर्चा काढुन रिलायंस स्टोर्स चा विरोध प्रदर्शन मुख्याधिकारी यांना दिले निवेदन.
कन्हान : – प्रहार जनशक्ती पक्ष कन्हान शहरा व्दारे तारसा रोड ते नगरपरिषद कार्यालय पर्यंत मोर्चा काढुन शहरातील छोटया मोठया व्यापा-यांच्या हितार्थ शहरात रिलायंस स्टोर्स उघडु देऊ नये तसेच दिव्यांग निधी वाटप करण्याच्या मागणीचे मुख्याधिकारी हयाना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
प्रहार जनशक्ती पक्ष नागपुर जिल्हा प्रमुख रमेश जी कारेमोरे यांच्या नेतुत्वात मोर्चा काढुन कन्हान नगर परिषद क्षेत्रातील छोटया व्यापा-यांचे कोरोना महामारी मुळे चांगलेच नुकसान झाले असल्याने रिलायंस स्टोर ला परवानगी देऊ नये. कारण रिलायंस स्टोर्स सारखे मॉल उघडले गेले तर छोटया व्यापा-यांना भयंकर नुक सान होईल. यास्तव प्रहार जनशक्ती पक्ष कन्हान शहर व्दारे नगरसेवक विनय यादव यांचे अध्यक्षेत तारसा रोड चौक ते नगरपरिषद कार्यालय पर्यंत निषेद मोर्चा काढुन ज्यात लॉउड स्पीकर व हाथा ला काळी फित बांधुन प्रहार संगठन चे कार्यकर्त्यानी घोषणा देत नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करित विरोध प्रदर्शन करण्यात आले. यावेळी प्रहार दिव्यांग संगठना ने निवेदन देऊन दिव्यांग निधी वाटप करण्याची तसेच शहरातील प्रत्येक बँकेत दिव्यांगा करिता वेगळे काउंटर बनविण्याची मांगणी केली. या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख रमेशजी कारेमोरे यांनी कन्हान शहराला सुव्यवस्थित नगररचना व स्वच्छ, सुंदर शहर बनविण्याचा संकल्प करण्याचा आपल्या मार्गदर्शनात कार्यकर्त्याना संबोधित केले. या वेळी प्रहार कन्हान शहर अध्यक्ष विनय यादव, सनोज पनिकर, विजय पारधी, विनोद किरपान, मयुर भोपडे, प्रविन बेलखोडे, राजु राऊत, प्रविण माने, प्रदिप धांडे , सागर फरकाडे, जयवंत थोरात, आस्तिक वझेकर, विनोद चामट, आकाश गिरडकर, कार्तिक टेकाम, सावंत रोकडे, नारायण वकलकर, राजेश्वरी पिल्ले, बहन पटले, अनिता मेश्राम, धनराज वरठी, मनोहर मेश्राम, प्रमोद सोनवाने, जश रामटेके, निलु गोंडाणे, कैलाश सुर्यवंशी, पिमकी श्रीवास्तव, रविन्द्र लोंडे, अश्विन भिवगडे, शैलेश पाठक, राजेश गजभिये, राहुल बावणे, राहुल सलामे सह कन्हान प्रहार संगठना चे व प्रहार दिव्यांग संगठना चे कार्यकर्ता आणि नागरिक उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा
न्यूज नेटवर्क