BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

प्रत्येक आव्हान पेलण्यास शिक्षक सक्षम —— पांडुरंगजी तुळसकर हिंगणघाट

Summary

संजय निंबाळकर                  मातोश्री आशाताई कुणावार कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय हिंगणघाट व विद्या विकास कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट च्या संयुक्त विद्यमाने  दिनांक ०५ सप्टेंबर रोजी ” शिक्षक दिन” निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, […]


संजय निंबाळकर              

   मातोश्री आशाताई कुणावार कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय हिंगणघाट व विद्या विकास कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट च्या संयुक्त विद्यमाने  दिनांक ०५ सप्टेंबर रोजी ” शिक्षक दिन” निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्या विकास शिक्षण संस्था हिंगणघाट चे अध्यक्ष पांडुरंगजी तुळसकर, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. विलास बैलमारे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी तथा जिल्हा समन्वयक, विद्या विकास कनिष्ठ महाविद्यालय, समुद्रपुर, प्रा चारुदत्त धात्रक, मातोश्री आशाताई कुणावार महिला महाविद्यालय हिंगणघाट चे प्राचार्य डॉ उमेश तुळसकर, विद्या विकास कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट चे प्राचार्य नितेश रोडे उपस्थित होते.      कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली, प्रसंगी प्रा. धात्रक यांनी सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या, प्रमुख अतिथी प्रा. विलास बैलमारे यांनी आव्हानात्मक काळातील शिक्षकांच्या योगदानाबद्दल भाष्य केले, प्राचार्य नितेश रोडे यांनी कोरोनाच्या काळातील शिक्षकांच्या समर्पित भूमिकेवर मत व्यक्त केले, मातोश्री आशाताई कुणावार महिला महाविद्यालय चे प्राचार्य डॉ उमेश तुळसकर यांनी शिक्षकांच्या बदलत्या भूमिका आणि समाजिक मानसिकता यावर भाष्य केले व अध्यक्षीय मनोगतातून पांडुरंगजी तुळसकर यांनी प्रत्येक आव्हान पेलण्यास शिक्षक सक्षम आहेत त्यामुळेच शिक्षकांकडे प्रत्येक कार्याकरीता आशास्थान म्हणून पाहिले जाते असे मत व्यक्त केले        कार्यक्रमाचे संचालन प्रा. अभय दांडेकर यांनी तर प्रास्ताविक प्रा. अजय बिरे व आभार सुधाकर टिपले यांनी मानले, कार्यक्रमाला मातोश्री आशाताई कुणावार महिला महाविद्यालय व विद्या विकास कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट चे सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती    संपूर्ण कार्यक्रमात सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रमाचे आयोजन करून मान्यवरांचे आभार मानून समारोप करण्यात आलासंजय निंबाळकर

उपसंपादक

पूर्व नागपूर

9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *