पॅन-आधार जोडणीसाठी शेवटचे 3 दिवस
केंद्र सरकारने पॅन आणि आधार कार्ड जोडणीसाठी पुढील आठवड्यातील 31 मार्च ही मुदत दिली आहे. हा नियम न पाळल्यास 10 हजार रुपयांचा दंड होणार असून, पॅन कार्डही बेकायदेशीर होणार आहे.
लोकसभेत अर्थ विधेयक 2021 मंजूर करताना सरकारतर्फे आयकर कायदा 1961 मध्ये नवीन कलम (234क ) जोडण्यात आले आहे.
यानुसार 31 मार्च 2021 पर्यंत पॅनला आधारशी लिंक न केल्यास मोठा दंड आकारला जाईल.
जे लोक पॅन कार्ड क्रमांकाला आधारशी जोडणार नाहीत अशांवर प्रशासनाकडून दंड आकारला जाईल, सोबतच पॅन कार्ड अवैध ठरण्याची शक्यता आहे. तेे कोणत्याही आर्थिक कामासाठी वापरता येणार नाही आहे. शिवाय पॅन कार्ड इनऑपरेटिव्ह असल्यास आयकर भरता येणार नाही. तसेच, 10 हजार रुपयांइतका दंड भरावा लागू शकतो.
दरम्यान, आतापर्यंत सरकारने पॅन आणि आधार जोडण्यासाठी अनेक संधी दिल्या आहेत. परंतु, अद्यापही अनेकांनी ही प्रक्रिया केलेली नाही. सरकार जास्त मुदत देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सूत्रांनी सांगितले
स्वार्थी करमकार
तुमसर महिला प्रतिनिधी