पुण्यातील मावळ तालुक्यात कोविड – १९ वाढत असल्याने प्रतिबंधक उपाय योजना सुरू
पत्रकार – सागर घोडके
पुणे ( मावळ)
पुण्यातील मावळ तालुक्यात कोविड – १९ वाढत असल्याने प्रतिबंधक उपाय योजना सुरू
मावळ – मावळ तालुक्यात पवन मावळ,नाणे मावळ यांसाठी कामशेत हे मुख्य बाजार पेठ म्हणून ओळखले जाते . त्यामुळे कामशेत मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होते. मावळ तालुक्यातील कोविड १९ चा प्रभाव ग्रामीण व शहरी भागात दिसू लागला आहे.
त्यामुळे मुख्य प्रदेशावरील रस्त्यावर पोलीसांनी सुचना फलक लावले आहे. बाजारपेठ जाण्यासाठी दोन डोस असेल त्यांनाच प्रवेश दिला आहे. तसेच बाहेर जाणाऱ्या व बाहेरून येणाऱ्या नागरीकांसाठी चेक पोस्ट वर येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांना पोलीसांच्या मदतीने थांबवण्यात येत आहे. व दुसरा डोस घेतला आहे का? विचारण्यात येत , किंवा दुसऱ्या डोसची मुदत संपली आसुन डोस घेतला नसलेल्यांना त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र, कामशेत येथे डोस देण्यात येतो. ज्या नागरिकांकडे दोन्ही डोस घेतलेल सर्टिफिकेट असेल त्यालाच सोडले जात.
तसेच प्रत्येक नागरिकांना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मास्क न वापरल्यास ५०० रूपये दंड आकारला आहे. तसेच अंतर पाळा कोरोना टाळा, मास्क चा वापर करा, अशा सुचना दिल्या जातात.