पत्रकाराची व्यथा
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क संपादकीय वार्ता*:-भारत देशात पत्रकारांना विशेष महत्त्व दिल्या जाते.
प्रिंट मिडिया व डिजीटल मिडिया असे मिडिया चे प्रकार आहेत.
आधुनिक काळात डिजीटल मिडिया ला विशेष महत्त्व आहे.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा पाया म्हणून गनल्या जातो.
केन्द्र सरकार व राज्य सरकार मिडिया ला विशेष महत्त्व देतोच परंतु पत्रकारांच्या सुरक्षेसाठी केन्द्र व राज्य सरकारने काय विशेष व्यवस्था केली?
पत्रकार हा समाजसेवा करीत प्रत्येक सरकारी, निमसरकारी कार्यालय व नेता, मंत्री, उद्योग पती , व्यापारी,दिन दुबळ्या ज्यांना न्याय मिळत नसेल अशा लोकांना लेखनी च्या माध्यमातून शासन व प्रशासन यांना जागृत करुन न्याय मिळवून देतो.
अवैधरित्या धंदे करणाऱ्यांचा व भ्रष्टाचार करणाऱ्या शासकीय अधीकाऱ्यांचा भांडाफोड करून सरकारच्या लक्षात आणुन देतो.
गोपनीय माहिती सुध्दा सरकारच्या लक्षात आणुन देतो.
सरतेशेवटी पत्रकाराचा भविष्य काय? अंधकारमय!
आपल्या पत्रकारीतेत तो मान अपमान सहन करतो.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब तसेच केन्द्रिय सुचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* च्या माध्यमातून ह्या विषयावर लक्ष देऊन पत्रकारांना न्याय देण्यात यावा.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-९७६५९२८२५९