नागपूर महानगरपालिका, नागपूर (जनसंपर्क विभाग) ता. 7 मे, २०२१ ४५ वर्षे वयोगटाच्या वरील नागरिकांचे रविवारी ही लसीकरण सुरु राहणार १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी आता 9 केन्द्रांवर लसीकरण
Summary
नागपूर, ता. 7 : नागपूर शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहराकरीता राज्य शासनाचे कोटयातून लसीचा साठा प्राप्त झाल्यामुळे शहरातील ४५ वर्षावरील नागरिकांचे सुविधेकरीता एकूण ९६ केन्द्रांवर लसीकरण करण्यात येईल. यामध्ये इंदीरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व अ.भा. आर्युविज्ञान […]
नागपूर, ता. 7 : नागपूर शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहराकरीता राज्य शासनाचे कोटयातून लसीचा साठा प्राप्त झाल्यामुळे शहरातील ४५ वर्षावरील नागरिकांचे सुविधेकरीता एकूण ९६ केन्द्रांवर लसीकरण करण्यात येईल. यामध्ये इंदीरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व अ.भा. आर्युविज्ञान संस्था (AIMS) मध्ये कोव्हिशिल्ड दिला जाईल. शासकीय व मनपाच्या 96 केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण रविवारी 8 मे ला करण्यात येईल. ही माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दिली. त्यांनी सांगितले की ४५ वर्षावरिल नागरिकांना दूसरे डोज साठी प्राधान्य दिले जाईल. ज्या नागरिकांचे दूसरे डोज शिल्लक आहे त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.
तसेच १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तिसाठी आता 9 केन्द्र सुरु आहेत. यामध्ये कोव्हेक्सीन लसीकरण स्व.प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केन्द्र, छाप्रु सर्वोदय मंडळ हॉल छाप्रुनगर सेंट्रल एव्हेन्यू, राजकुमार गुप्ता समाज भवन, बजेरिया, विरंगुळा केंद्र, जयहिंद सोसायटी, NIT ग्राउंड जवळ, मनीष नगर, डॉ आंबेडकर हॉस्पिटल,व मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (UPHC) या ठिकाणी करण्यात येईल. त्याशिवाय पाचपावली सुतिकागृह रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर व आयसोलेशन हॉस्पीटल इमामवाडा येथे कोव्हीशिल्ड लसीकरण करण्यात येईल.
विशेष म्हणजे १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे. केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन मनपा तर्फे करण्यात आले आहे.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज