तो मुख्य अधिकारी कोण? जो अवैध धंद्यांना चालना देतोय
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता*:-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील तुमसर तहसील व मोहाळी तहसील मध्ये अवैध रेती वाहतूक, सट्टा,जुवा,मोहफुल दारु असे अनेक प्रकारचे अवैध धंदे खुप जोरात सुरू आहेत.
ह्या मध्ये महसूल विभाग व पोलीस विभागाचा सिंहाचा वाटा आहे.
राज्य सरकारने रेती घाटाचे लिल्लाव केले नाही आहेत.
त्यामुळे पोलीस व महसूल विभाग ह्या बाबिचा फायदा घेत रेती माफिया व अवैध धंदे वाल्याकडुन लाखो रुपयांची वसुली करुन अवैध धंद्यांना चालना देत आहेत.
बल्कि अवैध रेती वाहतूकदारांकडुन रेति पकडुन घरकुल धारकांना कमी किंमतीत देण्याची हिंमत करत नाहित.
जिल्हाधिकारी कार्यालयातुन एखाद्या अधीकाऱ्यांची टिम निघतांच तहसील कार्यालयात भनक लागताच महसुल कर्मचारी अवैध रित्या रेति माफियाला सांगतात व ते सतर्कहोतात व रेति माफियांवर कार्यवाही होत नाही हा सर्रासर तहसील महसुल विभागाची चुकि यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही लक्ष देण्याची गरज आहे.
ह्या सर्व बांबिवर गृह मंत्रालय व महसूल मंत्रालय यांनी लक्ष देण्याची गरज आहे जेणेकरून सरकारचा करोडो रुपयांचा राजस्व वाचेल.
( तुमसर तहसील अवैध धंदेविषयी विस्तारित माहिती सादर व नंतर मोहाडी तहसील विषयावर विस्तारित माहिती सादर होणार आहे.)
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-९७६५९२८२५९