जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाचे माहिती व जनसंपर्क भवनात स्थलांतर
Summary
धुळे, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय, मुंबईच्या अधिनस्त जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, धुळेचे माहिती व जनसंपर्क भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे नाशिक विभागाचे माहिती उपसंचालक रणजितसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा माहिती […]
धुळे, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय, मुंबईच्या अधिनस्त जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, धुळेचे माहिती व जनसंपर्क भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे नाशिक विभागाचे माहिती उपसंचालक रणजितसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी अर्चना देशमुख यांनी दिली आहे.
जिल्हा वार्षिक योजनेतून धुळे येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालायचे महासंचालक आणि धुळे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या संकल्पनेतून राज्यातील पहिल्या माहिती व जनसंपर्क भवनाची इमारत साकारली आहे. या इमारतीत जिल्हा माहिती अधिकारी, धुळे या कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले आहे. या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02562- 232702, 02562- 237329 असा आहे, तर ई- मेल आयडी : diodhule2016@gmail.com असा आहे. या कार्यालयाशी संबंधित पत्र व्यवहार उपरोक्त नवीन पत्त्यावर करावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती देशमुख यांनी केले आहे.