जिल्हा बंदी असतानाही अवैध दारू तस्कऱ्यांचा बोलबाला?

चन्द्रपुर:- वरोरा: – राज्यात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्याने कडक निर्बंधसहित संचारबंदी घोषित केलि आहे, जिल्ह्याबाहेर प्रवास करायचा असल्यास वाहनचालकांना कारन असतांना प्रवासाची परवानगी मिळत नाही आहे. असे असतांना सुद्धा अवैध दारू तस्करी मात्र अजूनही सुरुच आहे. कधी नागपुर तर कधी वर्धा मार्गे चन्द्रपुर जिल्ह्यात अवैध दारू येत आहे. या अवैध दारू तस्कारांना विशेष सूट आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वरोरा तालुक्यात काही दिवसांपूर्वी पोलीस शिपायाने पहतेला तब्बल 18 लाखाची दारू पकडली. मात्र ती दारू त्याने का पकडली म्हणून पोलीस निरीक्षकांनी त्याला चांगलेच धारेवर धरले होते.
पुन्हा वरोऱ्यात पोलिसांनी 15 लाखांनच्या दारू सहित तब्बल 29 लाख 96 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
28 एप्रिल ला अवैध दारु वाहतुकीची गुप्त माहिती वरोरा पोलिसांना प्राप्त झाली, सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी खांबाडा चेकपोस्टवर नाकाबंदी केली, त्यावेळी अशोक लिलेंड कम्पनीचे चारचाकी वाहन पोलिसांनी थांबविले व चौकशी सुरु केली असता वाहन क्रमांक एमएच 49 एटी 2704 मद्धे अवैध दारुचा साठा आढळून आला.
सदर मालवाहतुक करणाऱ्या गाडिसमोर दारुची तस्करी सुखरूप व्हावी म्हणून, यासाठी ह्युंदई कार क्रमांक एमएच 49 बिके 3035 पेट्रोलिंग करीत होती. पोलिसांनी तात्काळ अवैध दारू सहित आरोपी नीलेश सुखदेव सेलोटे , राहील सलिमखा पठान, शेख जुबेर शेख, रंजीत चंद्रमणि मेश्राम, सर्व राहणार नागपुर यांना अटक करण्यात आली.
सदरची कारवाही सपोनी किटे, बेलसरे, प्रदीप पाटिल, सूरज व कपिल या पोलिस कर्मचार्यांनी यशस्वीपने पार पाडली.
अमोल बल्कि
चंद्रपुर जिल्हा
न्यूज रिपोर्टर