जनार्धन च्या मनमानी कारभारा मुळे संचालकांचे पुर्ण शेअर्स मिळाले ?अविश्वासू अध्यक्षावर कारवाई होणार ??
Summary
गडचिरोली प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षितांना बेरोजगारीच्या गर्तेतून बाहेर काढून रोजगार निर्मिती करण्यात यावी यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत.परंतू अनेक सहकारी संस्थांनी भोंगळ कारभार करून शासनाला लुटण्याचा प्रयत्न केला असल्याचे वृत्त हाती आले आहे. असाच प्रकार आता पंडित दीनदयाळ […]
गडचिरोली प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षितांना बेरोजगारीच्या गर्तेतून बाहेर काढून रोजगार निर्मिती करण्यात यावी यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत.परंतू अनेक सहकारी संस्थांनी भोंगळ कारभार करून शासनाला लुटण्याचा प्रयत्न केला असल्याचे वृत्त हाती आले आहे. असाच प्रकार आता पंडित दीनदयाळ उपाध्याय अभिनव नाविन्यपूर्ण सहकारी संस्था मर्यादित गडचिरोली चे अध्यक्ष जनार्धन साखरे यांच्या मनमानी आणि भोंगळ कारभारामुळे उजेडात आला आहे. संचालक मंडळात असलेल्या अनेकांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव ठेवून त्याबाबत जिल्हा निबंधक, सहायक उपनिबंधक यांना माहिती देण्यात आली आहे. परंतु या अधिकाऱ्यांनी सुध्दा हेतूपरस्पर दुलऀक्ष केले तरी❓ असा प्रश्न निर्माण झाला आहे.या संस्थेअंतर्गत नगरी येथील एका संचालकाच्या शेतात आइलमिल सुरू करण्यात येणार होते. या मिलचे बांधकाम करण्यात यावे यासाठी संस्थेच्या खात्यातून रक्कम काढण्यासाठी सर्वानुमते ठराव करण्यात आला होता. परंतु या संस्थेचे अध्यक्ष यांनी कोणत्याही प्रकारची कामे न करता परस्पर त्या पैशाची विल्हेवाट लावण्यात आली.त्यामुळे संचालकानी आपल्या शेअर्स ची मागणी करुन ही संस्थेच्या चेक द्वारे न देता वैयक्तिक खात्याच्या चेकच्या द्वारे दिली आहे.जनार्धन साखरे यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संस्थेच्या इतर सभासदांनी/ पदाधिकाऱ्यांनी अविश्वास ठराव पारित केला असून या बाबत जिल्हा उपनिबंधक यांना २५/८/२०२० रोजी कळविले आहे. त्यात साखरे यांनी केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. बरेच दिवस होऊनही निबंधकांनी काहीच कारवाई केली नसल्याने विविध शंका व्यक्त केल्या जात आहेत. संचालक मंडळात असलेल्या इतर पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे आणि आपल्याच मनमानी कारभाराने इतर काही लोकांना संचालक मंडळात सामील करून घेतल्यामुळे विविध शंका निर्माण झाल्या असून व्यवहारात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी होणार आहे का❓ असाही प्रश्न उपस्थित केला .