जनहितार्थ प्रश्न…… भारतात देण्यात येणारी कोरोनाची लस खरोखरच परिणामकारक आहे काय? से.नि. पोलीस महानिरीक्षक एस्.एम्. मुश्रीफ
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 24 एप्रिल 2021
शासनाने १२ जानेवारी २०२१ पासून भारतात लसीकरण सुरू झाले असल्याचे जगजाहीर केले.. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्सेस व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यामध्ये कोरोना-योध्दे म्हणजे पोलीस खाते, महानगरपालीका व इतर संबंधीत खाती यांच्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरीकांना लस देण्यात आली व ती प्रक्रिया अजून सूरू आहे. त्यांचेबरोबरच आता ४५ वर्षांवरील नागरीकांनाही लस देण्यात येत आहे. पण देण्यात येणारी लस किती प्रमाणात प्रभावी आहे याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. तसेच त्यामुळे होणारे दुष्परिणामही सुक्ष्मरित्या तपासणी करून घेणे गरजेचे आहे. असे स्पष्ट स्पष्ट मत सेवानिवृत्त पोलीस महासंचालक मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे.
लसीकरण सुरू झाल्यानंतर दोन-तीन आठवड्यात ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात आली त्यापैकी काहींना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणे व इतर ठिकाणाहून प्रसारमाध्यमांच्या माफऀत येऊ लागल्या. त्यावर शासनातर्फे व संबंधीत औषध कंपन्यातर्फे असा खुलासा करण्यात आला की लसीचे दोन डोस दिल्यानंतरच ती परिणामकारक होते. पण हा खुलासा चुकीचा असल्याचे दिसून आले कारण दोन डोसनंतरही कोरोनाची बाधा झाल्याच्या बातम्या मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सतत येऊ लागल्या. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दोन डोस नंतरही कोरोनाची बाधा (इंडियन एक्स्प्रेस, पुणे दि. १३, मार्च २०२१) महाराष्ट्र शासनाचे कोरोनासंबंधीचे प्रमुख तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या दोन नर्स, औरंगाबादचे तीन डॉक्टर वगैरेंना दोन डोसनंतरही कोरोनाची बाधा (टाइम्स ऑफ इंडिया, पुणे दि. १८, मार्च २०२१) यशवंतराव चव्हाण मेमोरीयल हॉस्पीटल, पिंपरी येथिल १५ डॉक्टर व १० नर्सेसना कोरोनाची बाधा. (टाइम्स ऑफ इंडिया, पुणे दि. २२, मार्च २०२१)
बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट हॉस्पीटल, खडकी येथिल एक डॉक्टर व दोन कर्मचारी कोरोना बाधीत. (पुणे मिरर, दि. २४, मार्च २०२१)
पुणे पोलीस आयुक्तालयातील १४४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा, त्यापैकी २१ हॉस्पिटलमध्ये दाखल व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ६५ कर्मचारी बाधीत, त्यापैकी ११ हॉस्पिटलमध्ये दाखल. (टाइम्स ऑफ इंडिया, पुणे दि. ७, एप्रिल २०२१) दिल्लीतील प्रसिध्द एम्स रूग्णालय व गंगाधाम रूग्णालय येथिल ७० डॉक्टरांना कोरोना. (दै. पुढारी, पुणे दि. १०, मार्च २०२१) अहमदनगर सिव्हील हॉस्पिटल मधील, डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी अशा ५० जणांना कोरोनाची बाधा. (टाइम्स ऑफ इंडिया, पुणे दि. १३, एप्रिल २०२१) दोन डोस घेतल्यानंतरही महाराष्ट्र पोलीस दलातील ३६०८९ अधिकारी व कर्मचारी कोरोनाने बाधीत, त्यापैकी २,९५० ॲक्टीव्ह केसेस व ३६४ मृत्यु. (इंडियन एक्स्प्रेस, पुणे दि. १३, एप्रिल २०२१) छत्तीसगढ राज्याचे आरोग्य सहसंचालक सुभाष पांडे, यांचा दोन डोस घेतल्यानंतरही कोरोनाने मृत्यु. (टाइम्स ऑफ इंडिया, पुणे दि. १५, एप्रिल २०२१) या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोना होण्याचे प्रमाण सर्वसामान्य जनतेत होणाऱ्या कोरोना इतकेच आहे. तसेच शासनातर्फे व औषध कंपन्यातर्फे जो दावा करण्यात येतो की, लस घेतल्यानंतर होणाऱ्या कोरोनाची तिव्रता कमी असते, हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण कमी असते व मृत्युचे प्रमाणही कमी असते तो चुकीचा आहे हे वरील आकडेवारीवरून स्पष्ट होते. सीरम इन्स्टिट्युटचे कार्यकारी संचालक आदर पुनावाला यांनी अचानक पुण्याहुन लंडनला स्थलांतर केल्यामुळे याबद्दलचा संशय अधिकच बळावला आहे.
तरी केंद्र शासनाने विशेषत: केंद्रिय आरोग्य मंत्र्यांनी लसीकरण हा प्रतिष्ठेचा विषय न करता त्याबद्दलची निश्चित आकडेवारी प्रसिध्द करावी व सध्या देण्यात येणारी लस परिणामकारक नसेल तर ती त्वरीत स्थगित करून फायझर सारखी १०० टक्के परिणाकारक लस देणे सुरू करावे. असे मत एस्.एम्. मुश्रीफ माजी पोलीस महानिरीक्षक यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना जनहिताच्या दृष्टीने व्यक्त केले.