BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

– चंद्राला खळे पडणे, धुमकेतू दिसणे अशुभ का मानतात ?

Summary

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि ७ मे. २०२१ धुमकेतू दिसणे, चंद्राला खळे पडणे या निसर्गनियमानुसार घडणाऱ्या घटना आहेत. त्या अशुभ मानण्याचे काहीही कारण नाही. सूर्य ,चंद्र, तारे, ग्रह यांच्यापेक्षा धुमकेतूचा आकार वेगळा असतो. तो अचनाक उगवतो, तसा अचानक नाहीसा […]

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि ७ मे. २०२१
धुमकेतू दिसणे, चंद्राला खळे पडणे या निसर्गनियमानुसार घडणाऱ्या घटना आहेत. त्या अशुभ मानण्याचे काहीही कारण नाही. सूर्य ,चंद्र, तारे, ग्रह यांच्यापेक्षा धुमकेतूचा आकार वेगळा असतो. तो अचनाक उगवतो, तसा अचानक नाहीसा होतो. *जेव्हा एखादी घटना अनाकलनीय वाटते, तेव्हा तिचा संबंध दैवी अगर अघोरी शक्तींशी किंवा शुभशुभाशी जोडला जातो. याच कारणाने धूमकेतूचे दिसणे अशुभ मानले गेले. धूमकेतूचे आगमन म्हणजे युद्ध, वादळ, दुष्काळ, राज्यक्रांती यांची पूर्वसूचना अशी समजूत जगात सर्वत्र होती. शेक्सपिअर च्या नाटकात धुमकेतूचा उल्लेख आहे.
When beggers die there are no comets seen
Heavens themselves blaze forth the death of princes
एडमंड हॅले या शास्त्रज्ञाने धुमकेतूवर संशोधन केले. हॅलेच्या संशोधनावर न्यूटनने गणित व भौतिकशास्त्र यांच्या आधारे धुमकेतूला ठराविक मार्ग असतो हे सिद्ध केले. सूर्याभोवती गुरुत्वाकर्षणामुळे ग्रह फिरत असतात. त्याप्रमाणे धूमकेतू सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. फरक इतकाच,की धुमकेतूचा सूर्यभोवतीचा प्रदक्षिणकाल खूप मोठा असतो. आज विज्ञानाच्या आधारे धुमकेतूचे पुनरागमन केव्हा होणार, हे आपणास ठरविता येते. गतवर्षी दिसलेल्या धुमकेतूचे निदान, तो किती काळ व कोणत्या ठिकाणी दिसेल, याचे गणिती ज्ञान वैज्ञानिकांनी आपणास आगोदरच दिले होते.
चंद्राभोवती खळे दिसणे हि सुद्धा निसर्गनियमनुसार घडणारी घटना आहे. त्याचा दैवी कोपाशी काहीही संबंध नाही. हवेत जे बाष्पाचे कण असतात ते खूप उंचावर गेले की कमी तापमनामुळे गोठतात. त्याचे हिमस्फटिक बनतात. या स्फटिकांवर चंद्राचे किरण पडले की, त्याचे वक्रीभवन (Refraction) होते. निरनिराळ्या रंगाचे वक्रीभवन निरनिराळ्या प्रमाणात होते. तांबडया रंगाचे कमी, जांभळ्या रंगाचे सर्वात जास्त वक्रीभवन होते. यामुळे चंद्राभोवती वलये निर्माण होतात. चंद्राप्रमाणे सूर्याला, गुरुला, शुक्राला सुद्धा खळी तयार होतात. इंद्रधनुष्य, सकाळी व संध्याकाळी आकाशाला येणारी लाली, आकाशाचा निळा रंग, या जशा प्रकाश शास्त्रीय घटना आहेत तशीच खळी दिसणे ही घटना आहे. तिला अशुभ मानण्याचे काहीही कारण नाही.
(-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या ‘अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’ या पुस्तकातून )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *