BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

चंद्रपूर जिल्ह्यात बुधवार पासून दारूविक्री परवाना नूतनीकरण प्रक्रियेला सुरुवात जून १५, २०२१

Summary

चंद्रपूर – तब्बल 6 वर्षांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यात आली असून चंद्रपूर जिल्ह्यात जून महिन्यापासून जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने सुरू करण्याची कारवाई सुरू होत आहे. त्यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप आयुक्त सुभाष बोडके व उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव […]

चंद्रपूर – तब्बल 6 वर्षांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यात आली असून चंद्रपूर जिल्ह्यात जून महिन्यापासून जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने सुरू करण्याची कारवाई सुरू होत आहे.
त्यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप आयुक्त सुभाष बोडके व उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर सिंह यांनी आज या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
जिल्ह्यातील दारूविक्री परवाना प्रक्रिया बुधवार 16 जून पासून चंद्रपूर, वरोरा व राजुरा येथे सुरू करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील परवाना धारकांनी यासंदर्भातील सर्व कागदपत्रे उत्पादन शुल्क विभागाकडे पडताळणी साठी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे, सदर प्रक्रिया तात्काळ स्वरूपात करायची असल्याने उत्पादन शुल्क विभाग कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे.
ज्यांचे दारूविक्री दुकान ज्या जागेवर आधी होते त्या जागेवर as it is असणार आहे.
उद्यापासून सुरू होत असलेल्या या प्रक्रियेत अनेक अर्ज येण्याची शक्यता असून सर्व प्रक्रिया कोविड 19 चे नियम पाळून करण्यात येणार आहे, अर्ज प्राप्त झाल्यावर त्याबद्दल 2 दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *