चंद्रपुर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अंदाजे 20लाखाचा मुद्देमाल जप्त केला
विक्की भाऊराव नगराळे
तालुका व चंद्रपूर शहर प्रतिनिधी
चंद्रपूर
चंद्रपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की मूर्तिजापूर जील्हा अकोला ईथुन महिंद्रा पिकअप वाहन क्र, MH-10-CR-5950 या वाहनाने देशी दारू चा साठा येत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली असता.
त्या आधारे बल्लारपूर पेपर मिल समोर चंद्रपुर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून चंद्रपूर मार्गावरून येत असलेल्या महेंद्र पिकअप ला थांबवून झडती घेतली असता त्यात 26 पांढऱ्या पोत्यांन मध्ये कांदे व 34 पांढऱ्या पोत्यांन मध्ये अवैध देशी दारू आढळून आली.
वाहनासह अवैद्ध दारु साठा जप्त करून पोलीस ठाण्यात आणले व आरोपी शुभम प्रमोद मिराशे (चालक, वय 22) अभिलाष प्रभाकर वैद्य (बाजूला बसलेला)
दोनही रा, धानोरा वैद्य, ता,मूर्तिजापूर जी, अकोला यांना ताब्यात घेऊन कलम65 अ 83गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई 23 सप्टेंबर चा मध्यरात्री दरम्यान करण्यात आली.10लाखाची देशी दारू ,9लाखाची बोलेरो महिंद्रा पिकअप, एक मोबाईल,आणि कांदे असे मिळून अंदाजे20लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तर बोलेरो वाहनात अवैध रित्या देशी दारू चा साठा कोणत्या ठोक दारू विक्रेता ला देण्यात येत होता याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवलाल एस. भगत यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक विनीत घागे करीत आहे.