गणेश चुक्कल वर कठोर कारवाई करण्याची निवेदनाने मागणी
संताजी ब्रिग्रेड तेली समाज महासभा चे कन्हान पोलीस निरीक्षकांना निवेदन.
नागपूर कन्हान : – मुंबई ला तेली समाजाचा अपमान करणा रे बॅनर लावुन तेली समाजाचा अपमान केल्याने संता जी ब्रिग्रेड तेली समाज महासभा चे उपाध्यक्ष महेंन्द्र भुरे यांचा नेतृत्वात व कन्हान नगराध्यक्षा सौ.करुणा ताई आष्टणकर यांचा प्रमुख उपस्थितीत कन्हान पोली स स्टेशनचे निरीक्षकांना निवेदन देऊन गणेश चुक्कल वर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलना चा ईशारा दिला आहे.
गणेश चुक्कल ह्यानी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबई सिनेसृष्टीशी संबंधित नट, उद्योजकांच्या भेटीच्या पार्शभुमीवर मुंबई ला आल्याने संपुर्ण मुंबई त जागो-जागी ” कहा राजा भोज…. और कहा गंगु तेली….” कुठे महाराष्ट्रांच वैभव …. तर कुठे युपी चं दारिद्र ….” अश्या प्रकारांचे बॅनर लावुन तेली समाजाला थेट दारिद्र म्हटले असुन तेली समाजा चा अपमान केला आहे. अश्या जातीवाचक टिप्पणी करि त गणेश चुक्कल याने समस्त तेली समाजाच्या भावना दुखवल्या व संविधान नुसार आमच्या मुलभुत हक्कांचे हनन केले आहे. डॉ महेंन्द्र कुमार धावडे लिखीत तेली समाजाचा इतिहास व संस्कृती हया पुस्तकात संशोधन करुन खरी म्हण ” कहा राजा भोज, कहा विजेता गांगेय ” अशी आहे. गणेश चुक्कल हयानी चुकीची म्हणीचे बॅनर लावुन समाजभुषण गांगेय (गंगु) देवाचा सुद्धा अपमान केल्याने तेली समाज कदापी सहन कर णार नाही. अश्या संतापजनक प्रकार करणारे गणेश चुक्कल यांचे वर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्य था तीव्र आंदोलनाचा ईशारा दिला आहे. संताजी ब्रिग्रे ड तेली समाज महासभा (महाराष्ट्र) च्या शिष्टमंडळाने कन्हान पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. शिष्टमंडळात संताजी ब्रिग्रेड तेली समाज महासभा (महाराष्ट्र) चे उपाध्यक्ष महेंन्द्र भुरे, कन्हान नगराध्यक्षा सौ. करुणाताई आष्टणकर, रामटेक विधानसभा युवक आघाड़ी अध्यक्ष अमोल साकोरे, ॠषभ बावनकर, देवचंद कुंभलकर, कुबेर पोटभरे, विजय बावनकुळे, यशवंत चामट आदी सह तेली समाजाचे नागरिक उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
९५७९९९८५३५