गडचिरोली जिल्हा शिक्षक भारती अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटने तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन ” ऐनवेळी माजी विद्यार्थ्यानी दिली हाकेला साद”
गडचिरोली विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 10. मे. 2021:-
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने हाहाःकार माजला असतांना आणि रक्ताचा तुटवडा जाणवत असताना आपणही समाजाचे काही देने लागतो या भावनेतून गडचिरोली जिल्हा शिक्षक भारती अनुदानित आश्रम शाळा संघटने तर्फे दि 9 मे ला नजीकच्या अनुदानित माध्य.आश्रम शाळा चांदाळा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
गडचिरोली जिल्हा शिक्षक भारती अनुदानित आश्रमशाळा संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री सतीश पवार ,उपाध्यक्ष श्री महेश बोरेवार,मार्गदर्शक राजू भाऊ कात्रटवार,श्री अनिल सहारे,श्री सुधीर झंझाळ,श्री.नितीन चेंबूलवर यांनी संघटनेच्या सदस्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आणि याला प्रतिसाद देत संघटनेच्या 35 शिलेदारांनी रक्तदानाकरिता नावही नोंदविले. मात्र यातील बहुतेक रक्तदात्यांनी कोविड लसीकरणाचा पहिला डोस घेतला असल्याने डॉक्टरांनी त्यांचे रक्त घेण्यात असमर्थता दर्शवली.आणि ऐनवेळी पेच निर्माण झाला.
मात्र एखादी गोष्ट मनात धरली आणि हेतू जर चांगला असेल तर मार्ग निघतोच याचा प्रत्यय या वेळी आला.
श्री.सतीश पवार,श्री.महेश बोरेवार आणि श्री.अनिल साहारे यांनी रक्तदानाच्या पूर्व पूर्वसंध्येला चांदाळा येथील ग्रामस्थ व अनुदानित माध्य.आश्रम शाळा चांदाळाच्या माजी विद्यार्थ्यांना या गोष्टीची माहिती दिली आणि संघटनेच्या हाकेला दाद देत अनेक तरुण स्वेच्छेने या पवित्र कार्यासाठी समोर आले.
विनोद जेंगठे , सुभाष किरंगे , सुरज कोवे ,सरगम गावळे , प्रशांत सीडाम ,साहिल तुमरेटी , सुरज उसेंडी , अंकुश दुगा , रोशन दरो , सचिन तुमरेटी , नितेश वेस्कडे , बादल वेस्कडे , रमेश वेस्कडे , विकास कोवे इ. गावातील युवकांनी पुढाकार घेत ऐनवेळी रक्तदान केले .त्याचबरोबर शिक्षक भारती अनुदानित आश्रमशाळा संघटनेच्या सदस्यांनी ही रक्तदान केले. शिबिरात एकूण 31रक्तदात्यांनी रक्तदान केले .
चांदाळा येथील तरुणांनी ऐनवेळी घेतलेल्या पुढाकाराबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. या रक्तदान शिबीराकरिता श्रीमती डॉ साखरे , सतीश टक्कलवार , व त्यांचे वैद्यकीय पथक ,व संघटनेचे सदस्य नितीन चेंबूलवार , रवींद्र अलोने , खुशाल पटले, शैलेश भैसारे , धनराज चूधरी,ए. एम.नरुले,जगजीवन सेलोकर,मनोज सोमनकार , गुरुदेव गोरटेकर, हीवराज कोहपरे ,यांचे सहकार्य लाभले.