खैरीत सरपंचाच्या पुढाकाराने स्वयंस्फूर्तीने राबविला कोरोना तपासणी शिबिर…,…

कामठी. सध्या सुरू असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक गावात शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे पसरलेल्या चुकीच्या माहितीमुळे जनता तपासणी करण्यास टाळाटाळ करीत आहे परंतु संकटाला न डगमगता आलेल्या संकटाला लढायला सदैव तत्पर असणारे खैरी चे सरपंच मोरेश्वर कापसे यांनी स्वतः पुढाकार घेऊन माझे कुटुंब व माझी जबाबदारी या शासनाच्या आव्हानावर गावात सर्वत्र जंतुनाशक फवारणी केली असून तब्बल दोन वेळा कोरोना तपासणी शिबिराचे आयोजन केले 25 सप्टेंबर रोजी झालेल्या शिबिरात गावातील व परिसरातील विविध कारखान्यातील एकूण शंभराच्यावर लोकांनी स्वतःहून सरपंचाच्या आव्हानावर कोवीड 19 ची तपासणी करून घेतली सरपंच मोरेश्वर कापसे यांनी गावाच्या हद्दीत अनेक कारखाने पेट्रोल पंप असून बाहेर गावातील रोजगारासाठी अनेक लोक आलेले आहेत गावातील लोक व त्यांना एकमेकांपासून कोणतीही रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये याकरता या शिबिराचे आयोजन केले केले असल्याचे सांगितले याला प्रामुख्याने वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल राऊत प्रकाश भारद्वाज वैशाली गोडाळे धनराज लोखंडे कृष्णा अवधूत बंडू बारापात्रे तुषार मून सुनिता नेवारे बळवंत खराबे दुर्गादास नारनवरे यांचे विशेष सहयोग लाभले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खैरी गावचे सरपंच बंडू कापसे उपसरपंच वीणा रगताटे स्वयंसेवक कुणाल शेंडे प्रमोद शेंडे राहुल माळवे तसेच ग्रामपंचायतचे सदस्य कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर मदतनीस आधी प्रयत्नशील होते
विठ्ठल ठाकरे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9850310282