कोंढाळी प्रा.आ.केंद्राला 07 ऑक्सीजन कंन्सेट्रेटर व 03ई सी जी चे उपकरण मंजूर अनिल देशमुख लसीकरनाचे लक्षांक पुर्ण करा लक्षांक पुर्ण करण्या साठी जनजागृति करा! गावोगावी जाऊन लसीकरणाचे शिबीर लावण्याचे निर्देश
कोंढाळी-वार्ताहर-कोंढाळी
कोंढाळी सह 43गावांच्या नागरिकांच्या आरोग्य व कविड (कोरोना)बाबद कोंढाळी प्रा.आ.केंद्रात पोहचून माहिती समजवून घेतली।
तसेच तहसीलदार, बी डी यो , ग्रा प सरपंच , ग्राम विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस अधिकारी, यांना सुचना केल्या । कोंढाळी येथील ग्रामीण रूग्णालयाचे बांधकामाचे निरिक्षण करण्याचे वरिष्ठ बांधकाम व आरोग्य खात्याचे अधिकार्यां ना निर्देश दिले।
सोबतच कोंढाळी प्रा थमिक आरोग्य केंद्राला ऑक्सीजन कंन्सेट्रेटर त्वरीत पुरविण्याचे निर्देश दिले।
उपस्थित अधिकारी, पदाधिकारी, व उपस्थित कार्यकर्त्यांना कोविड च्या तिसर्या लाटेपासुन सुरक्षित राहण्याकरीता जन जागृती करावी असे आवाहन केले।
या प्रसंगी कोंढाळी चे स्वास्थ अधिकारी डाक्टर जयश्री वाळके यांनी कोंढाळी प्रा.आ.केंद्राअंतरगत कोविड 19 विषाणू चे संक्रमितांविषयी माहीती देत सांगितले की कोंढाळी प्रा आ केंद्र अंतरगत 04मे पर्यंत 10082 रुग्णांची तपासनी करन्यात आली असुन यात 5514एंटीजन टेस्ट तर 4568आर टि पी सी आर टेस्ट करण्यात आल्या,या पैकी1003संक्रमित (पाजेटिव्ह)आढळले होते।
सध्या स्थितीत 312 कोविड संक्रमित आहेत, ते सर्व गृह विलगकरनात आहेत, यात 138 एक्टिव रुग्ण एकट्या कोंढाळीत आहेत,ही बाब फार गंभीर असुन स्थानिक व ग्रामीण चे अनेक एक्टीव रुग्णांकडून कोविड19चे प्रतिबंधात्म नियमाली चे पालन केल्या जात नाही। सध्या 675रुग्ण बरे झाले तर 18संक्रमितांचे मृत्य झाले आहे।
या प्रसंगी जि प सदस्य चंद्रशेखर कोल्हे, रामदास मरकाम, पंचायत समीती सदस्य अरूण ऊईके,संरपच केशवराव धुर्वे, उपसरपंच स्वप्निलसिंह व्यास, ग्रा प सदस्य संजय राऊत, दुर्गाप्रसाद पांडे,राजेंद्र जाधव, सुभाष पाटील ठवळे, सुरेंद्र कुर्वे, याकूब पठाण,किशोर रेवतकर, ब्रजेश तिवारी, राजेंद्र खामकर, प्रशांत खंते, अजय लाडसे, आकाश गजबे,संजय गायकवाड़,फैजानशेख,– तहसीलदार अजयचरडे नायाब तहसीलदार निलेश कदम, बी डी ओ संजय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डाक्टर शशांक व्यव्हारे,आरोग्य अधिकारी डाक्टर जयश्री वाळके, डाक्टर सुहास मोरे, ठाणेदार विश्वास फुलरवार, ग्रामविकास अधिकारी दिलिपसिंग राठोड यांनी या प्रसंगी माहीती दिली ।