कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे निरिक्षणे घेऊन उपाययोजना करणण्याचे कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन.
Summary
आपल्या गोंडपिपरी तालुक्यातील कुडेसावली, परसोडी, पाचगाव, गणपुर,कन्हाळगाव,तसेच ईतर गावातील शेतकरी सुध्दा बऱ्याच प्रमाणात कपाशी लागवड केली आहे,सध्याचे वातावरण गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे कापुस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या कापुस पिकाचे निरीक्षणे नियमित सर्वेक्षण करून खालील उपाययोजना […]
आपल्या गोंडपिपरी तालुक्यातील कुडेसावली, परसोडी, पाचगाव, गणपुर,कन्हाळगाव,तसेच ईतर गावातील शेतकरी सुध्दा बऱ्याच प्रमाणात कपाशी लागवड केली आहे,सध्याचे वातावरण गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे कापुस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या कापुस पिकाचे निरीक्षणे नियमित सर्वेक्षण करून खालील उपाययोजना करण्याचे आवाहन श्री.मा.नितीन.पी. प्रजापती.
कृषी सहाय्यक व कृषी विभाग गोंडपीपरी यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
कन्हाळगाव येथिल प्रत्यक्ष शेतावर विजिट देण्यात आली काही शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली आणि बोंड अळी ची फवारणी करावी असे आवाहन करण्यात आले.
खालील उपाययोजना.
१. फेरोमन सापळ्यांचा वापर करावा
२.फुलवस्थेत दर आठवड्याचे डोमकळ्या (प्रादुर्भाव ग्रस्थ फुले) शोधून नष्ट करावा.
३. ५% निबोळी अर्क फवारणी करावी.
४. ५ ते१०% नुसकान झाल्यास थायोडीकार्ब ७५% डब्लू पी २५ग्रम फवारणी करावी.
५.जास्त १०% च्या वर असेल तर क्लोरोपायपॅक्स ५०%+सायपरमेत्री ५% २० मिली. किंवा ट्रायझोफ्यास३५%+ डेल्टामेथ्रीन १% १७ मिली या मिश्र कीटनाशकांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कापुस क्षेत्रात कृषी विभागा मार्फत कृषी वार्ताफळकावर कृषी संदेश लाऊन, शेतकऱ्यांची सभा घेऊन प्रचार प्रसिध्दी करण्यात आली आहे.
श्री. मा. प्रदिपभाऊ कुळमेथे.सरपंच, साखरे ग्रामसेवक.नितीन प्रजापती कृषि सहाय्यक अनिल पेन्दोर शेतकरी मित्र श्री. विलास मंगाम. रमेश आत्राम. विजय सिडाम. इत्यादी शेतकरी बांधव उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रदिप अर्जुन कुळमेथे
ग्रामीण तालुका प्रतिनिधी
तालुका गोंडपिपरी.
मो. न.७७६८८३१०५५