महाराष्ट्र हेडलाइन

कन्हान शहरात व परिसरात लाॅकडाऊन चे नियम तात्काळ कडक करण्याची मागणी कन्हान- पिपरी शहर व परिसर रेड झोन मध्ये जाण्याची दाट शक्यता. कन्हान शहर विकास मंच पदाधिकारी व्दारे न प मुख्याधिकारीना निवेदन.

Summary

नागपूर (कन्हान ): – शहरात व परिसरात मागील काही दिवसा पासुन कोरोनाचा फैलाव अतिवेगाने वाढत असुन सुद्धा कन्हान-पिपरी नगरपरिषद प्रशासन कोरोना चा फैलाव थांबविण्याकरिता कुठल्याही प्रकारची उपाय योजना करीत नसल्याने कन्हान शहर विकास मंचच्या पदाधिका-यानी मंच उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या […]

नागपूर (कन्हान ): – शहरात व परिसरात मागील काही दिवसा पासुन कोरोनाचा फैलाव अतिवेगाने वाढत असुन सुद्धा कन्हान-पिपरी नगरपरिषद प्रशासन कोरोना चा फैलाव थांबविण्याकरिता कुठल्याही प्रकारची उपाय योजना करीत नसल्याने कन्हान शहर विकास मंचच्या पदाधिका-यानी मंच उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या नेतृत्वात नगरपरिषदचे मुख्यधिकारी गिरीश बन्नोरे यांना भेटुन कोरोना विषयावर चर्चा करून निवेदन देऊन कन्हान-पिपरी शहरात व परिसरात लाॅकडाऊनचे नियम तात्काळ कडक करण्याची मागणी करून कन्हान – पिपरी शहरात व परिसरात मागील काही दिवसापासुन कोरोनाचा फैलाव अतिवेगाने वाढत असुन सुद्धा नगर परिषद प्रशासना द्वारे कोरोना विषाणुचा फैलाव थांब विण्याकरिता कुठल्याही प्रकारची कडक उपाय योजना करतांना दिसत नसल्याने कन्हान शहर व परिसर रेड झोन मध्ये जाण्याची दाट शक्यता वाढली आहे. कन्हान शहरातल्या बाजार पेठेत कोरोनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करतांना दिसत नसुन नागरिक बिना कामा ने बाहेर पडत आहे. तसेच मास्क, सेनिटाईझर व सोशल डिस्टेर्सिंग चे पालन न करीत असल्याने कन्हान शहरात व परिसरात कोरोनाचा फैलाव अति वेगाने वाढत असुन किती तरी लोक बळी पडत असुन मृत्यु दरांची संख्या अतिवेगाने वाढत आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे कन्हान शहरात व परिसरात कोरोना बाधित रुग्ण शहरात व परिसरात फिरत असुन सुद्धा नगरपरिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. कन्हान शहर पासुन काही अंतरावर असलेल्या वराडा गावात कोरोनाचा विस्फोट झाल्याने वराडा गाव बंदी करण्यात आली होती. यास्तव कन्हान-पिपरी शहरात व परिसरात कोरोनाचा फैलाव थांबविण्याकरिता संपुर्ण शहरात सेनिटाइजरची फवारणी करणे अत्यंत गरजेचे झाले असुन शहरातल्या बाजारपेठेत कोरोनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन न करणा-यावर तसेच मास्क, सेनिटाइझर व सोशल डिस्टेन्सचे पालन न करणायावर दंडात्मांक कारवाई करून कोरोनाचा फैलाव थांबविण्याकरिता तात्काळ प्रतिबंधात्मक कडक उपाय योजना करून कन्हान शहरात व परिसरात लाॅकडाऊनचे नियम तात्काळ कडक करण्याची माग णी कन्हान शहर विकास मंच पदाधिका-यांनी मंच उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या नेतृत्वात नगरपरिष दचे मुख्यधिकारी गिरीश बन्नोरे हयांना भेटुन कोरोना विषयावर चर्चा करून निवेदन देऊन करण्यात आली आहे. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंचचे अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, महासचिव संजय रंगारी, हरीओम प्रकाश नारायण, प्रविण माने, रविंन्द्र सांकला, शाहरुख खान, अमित भारत्वाज, अमोल साकोरे, हर्ष पाटील सह मंच पदाधिकारी उपस्थित होते.

संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *