हेडलाइन

कन्हान परिसरात दोन दिवसीय विविध कार्यक्रमा ने महाशिवरात्री महोत्सव थाटात साजरा

Summary

  कन्हान परिसरात दोन दिवसीय विविध कार्यक्रमा ने महाशिवरात्री महोत्सव थाटात साजरा “हर हर महादेव”बम बम भोले” च्या जयघोषात नागरिकांनी केली पुजा अर्चना   कन्हान : – पिपरी व कांद्री परिसरातील शिव मंदिरात महाशिवरात्री निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करून नागरिकांनी […]

 

कन्हान परिसरात दोन दिवसीय विविध कार्यक्रमा ने महाशिवरात्री महोत्सव थाटात साजरा

“हर हर महादेव”बम बम भोले” च्या जयघोषात नागरिकांनी केली पुजा अर्चना

 

कन्हान : – पिपरी व कांद्री परिसरातील शिव मंदिरात महाशिवरात्री निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करून नागरिकांनी पुजा, अर्चना, भजन कीर्तन व महाप्रसाद वितरण करून महाशिवरात्री महोत्सव उत्साहाने थाटात साजरी करण्यात आली.

 

सिद्धविनायक गणेश मंदिर पांधन रोड कन्हान

 

महाशिवरात्री निमित्य पांधन रोड स्थित सिद्ध विनायक गणेश मंदिरास फुलानी सजावट करण्यात आला. शिव मंदिरात पहाटे सकाळी शिव भोले व त्रिशुल चा अभिषेक, पुजा अर्चना करण्यात आली. याप्रसंगी शैलेश झेंडे, अमित थटेरे, राजा शंभोजी, मनीष वैद्य, गणेश चौधरी यांनी सहपत्नी सहभाग घेतला. समिती सचिव जगमोहन कपुर हयानी व्यवस्था साभाळली.

 

शिव मंदिर पिपरी

 

कन्हान परिसरातील पिपरी शिव मंदिरात ३७ व्या वर्षी पर्दापण करीत असुन गावातील सेवाभावी नागरिकांच्या वतीने महाशिवरात्री निमित्य शिवलिंग चे जलभिषेक करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. नागरिकांनी पुजा पाठ हवन कार्यक्रम रात्रभर महादेवाचे भजन गायण करून नागरिकांना कढई चा प्रसाद वितरण करून महाशिवरात्री उत्साहाने थाटात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रशांत मसार, कुंदन रामगुंडे, क्रिष्णा गावंडे, शिवशंकर भोयर, भोजराज मेश्राम, संजय हावरे, मनोहर कुआमनोरे, प्रल्हाद पडाडे, निलेश साबरे, अजाबराव कडनाके, देवाजी येलमुले, संजय गुडधे, राजु कावळे सह नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.

 

शिव सेवा चॅरीटेबल ट्रस्ट गहुहिवरा रोड कन्हान

 

शिव सेवा चॅरीटेबल ट्रस्ट आनंद नगर गहुहिवरा चौक कन्हान द्वारे शिव मंदीरात महाशिवरात्री च्या दिवशी सकाळी शिवलिंग चे जलभिषेक करून कार्य क्रमाची सुरूवात करण्यात आली. नागरिकांनी भजन कीर्तन करित पुजा अर्चना केली. दुसऱ्या दिवशी परि सरात भव्य महाप्रसाद वितरण करून महाशिवरात्री महोत्सव थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी छोटेलाल मानिकपुरी, संजय गाते, सिता कनोजिया, सुनिता मानिकपुरी सह नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.

 

कांद्री वार्ड क्र.१ शिव मंदिर कांद्री-कन्हान

 

कांद्री वार्ड क्र. १ येथील शिव मंदिरात हनुमान मंदिर पंच कमेटी व शिव मंदिर पंच कमेटी यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्री महोत्सव दोन दिवसीय कार्यक्रमाने थाटात साजरा करण्यात आला. महाशिव रात्री च्या दिवशी सकाळी शिवलिंग चे दही, दुध व जलभिषेक करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. दिवसभर नागरिकांनी शिव मंदिरात जाऊन शिवलिंगा वर बेलबत्ती, पुष्प वाहुन पुजा अर्चना केली . त्यानंतर रात्री शिव भजन महिला मंडळ द्वारे भजन कीर्तन कार्यक्रम करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळ पासुन भजन कीर्तन कार्यक्रम करून दुपारी महेंद्र पलिये यांच्या हस्ते दहिकाल्या चा कार्यक्रम आरती करण्यात आली. सायंकाळी परिसरात महा प्रसाद वितरण करून महाशिवरात्री महोत्सव उत्सा हाने थाटात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कवडु बारई, धनराज चोपकर, जिभल सरोदे, सीताराम बावनकुळे, शंकर सरोदे, कवडु आकरे, वामन देशमुख , वासुदेव आकरे, रामा हिवरकर, राजेश पोटभरे, उषा वंजारी, इंदुबाई ठेमरे, सुनीता हिवरकर, मंगला कांबळे , मधुकर कांबळे, उषा वाडीभस्मे, पुष्पा झोडावने, अरूणा डोकरीमारे, कांता टेकाम, वेनुबाई वाघाडे, विमल बोरकर, आशाबाई दखनकर, सुमित्रा वैद्य सह नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहुन सहकार्य केले.

 

हनुमान मंदिर चौक, टेकाडी

 

टेकाडी हनुमान मंदिर चौक येथे महाशिवरात्री निमित्य ॐ साई ज्वेलर्स चे मालक ओमकार कडु यांच्या द्वारे नागरिकांना अल्पोहार वितरण करून महाशिवरात्री महोत्सव थाटात साजरा करण्यात आला . याप्रसंगी पंढरी बालबुधे, नत्थुजी मोहाडे, मनोज लेकुरवाले, माधोराव मरघडे, नंदु लेकुरवाळे, रवि खानकुले, अजित मोहाडे, रमेश बालपान्डे, श्रीकांत हुड , मुलचंद सातपैसे, सोनु मरघडे सह नागरिक बहु संख्ये ने उपस्थित राहुन सहकार्य केले.

संजय निंबाळकर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *