आरक्षणाची कल्पना ही राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी प्रथम १८६९ ला आणि नंतर १८८२ ला इंग्रज सरकारपुढे मांडली.
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 25 एप्रिल 2021
Implimentation of Riservation अर्थात, आरक्षणाची अंमलबजावणी भारतात आधुनिक काळात सर्वांत प्रथम राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी आपल्या अर्थात कोल्हापूर संस्थानात दि. २६ जुलै १९०२ पासून सुरु केली.
( Policy of Reservation) अर्थात, आरक्षणाची नीती , धोरण विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉ भिमराव आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातुन २६ जानेवारी, १९५० पासून निश्चित केले. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या आरक्षण या कल्पनेला लागू करण्याचे काम त्यांचे पट्टशिष्य राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी केले. राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी ता.२६ जुलै, १९०२ रोजी सर्व ब्राह्मणेत्तरांसाठी ५०% आरक्षणाची घोषणा आपल्या करवीर संस्थानात म्हणजेच कोल्हापूर संस्थानात केली. ६६४ संस्थानापैकी बहुजन समाजासोबत सामाजीक न्याय करणारी ३ संस्थाने होती.
१) करवीर अर्थात कोल्हापूर,
२) बडोदा आणि ३) इंदौर..
दोन मराठा कुणबी व एक धनगर.
राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी जे ५०% आरक्षण घोषित केले त्यातुन केवळ चारच जाती वगळल्या.१) ब्राह्मण,२) शेणवी,३) प्रभू, ४) पारशी.या चार पुढारलेल्या जाती वगळून बाकी सर्व जातींना अर्थात, ब्राह्मणेत्तरांना म्हणजेच बहुजन समाजाला आरक्षण अर्थात प्रतिनिधित्व घोषित केले याला म्हणतात Implimentation of Reservation
म्हणजेच आरक्षणाची अंमलबजावणी.राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी आरक्षण का दिले.महाराजांनी अगोदर पाहणी केली.या पाहणीत त्यांच्या लक्षात आले की,सरकारी दरबारी ७१ पैकी ६० ब्राह्मण उच्च पदाच्या नोक-यावर होते.व ११ ब्राह्मणेत्तर होते. तसेच खाजगीत ५२ पैकी ४५ युरेशियन ब्राह्मण नोकरीत होते व ७ ब्राह्मणेत्तर होते.
हा प्रशासनातील असमतोल दूर करण्यासाठी राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी सर्व ब्राह्मणेत्तरांसाठी ५० % आरक्षणाची घोषणा केली.
त्यापूर्वी सर्व मोक्याच्या व
मा-याच्या जागा माधव बर्वे या चितपावन ब्राह्मणाने आपल्याच जातीतील लोकांना नोक-या दिल्या होत्या.राजर्षी छत्रपति शाहू महाराजांच्या या क्रांतिकारी निर्णयाला,बहुजन उद्धारक निर्णयाला खालील लोकांनी कडाडून विरोध केला.त्यामध्ये
१) न्यायमूर्ती ? महादेव गोविंद रानडे,२) रघुनाथ व्यकाजी सबनीस,३) गोपाळ कृष्ण गोखले,४) शि.म. परांजपे
५) नरहरी चिंतामण केळकर,
६) दादासाहेब खापर्डे,
७) बाळ गंगाधर टिळक,
८) अँड. गणपतराव अभ्यंकर (सांगली) यांचा समावेश आहे.
आरक्षणाला विरोध करणारे सर्व च्या सर्व ब्राह्मण होते.
आजही त्यांच्या मानसिकतेत फरक पडला नाही. खरे तर राजर्षी छत्रपति शाहू महाराज स्वत: राजे होते, व स्वत:च्या संस्थानात आरक्षण देणार होते.
वरील लोकांच्या घरातून किंव्हा खिशातुन किंव्हा ब्राह्मणांच्या संस्थानातुन देनार नव्हते तरी वरील ब्राह्मणांनी ब्राह्मणेत्तरांच्या आरक्षणाला विरोध केला होता.
त्यातील एका ब्राह्मणाने कळसच गाठला.त्याचे नाव गणपतराव अभ्यंकर.हा सांगलीच्या पटवर्धन संस्थानात मध्ये नोकरीस होता.
हा पटवर्धन कोण ❓”मैने प्यार किया” या सिनेमातिल सलमान खान ची नायिका भाग्यश्रीचा आजोबा. अँड गणपतराव अभ्यंकर सांगलीवरुन कोल्हापूर ला आले व राजर्षी छत्रपति शाहू महाराजांची भेट घेऊन
१) जातवार स्कॉलरशिप व
२) जातवार नोक-या देण्याच्या निर्णयाला विरोध करु लागले.
त्यांच्या मते लायकी पाहूनच स्कॉलरशिप व नोक-या द्यायला पाहिजेत. आरक्षणासंबंधी अभ्यंकराला वाईट का वाटत होते ❓कारण त्यामुळे कोल्हापूर संस्थानातील ब्राह्मणांना नोक-या मिळणार नव्हत्या, ते होऊ नये म्हणून सांगली संस्थानातील हा ब्राह्मण कोल्हापूर ला गेला व छत्रपति शाहू महाराजांना असे आरक्षण देऊ नये असा सल्ला दिला.याला म्हणतात जातीय हित व जातीय चेतना,आजही सर्व पक्षातिल ब्राह्मणांमध्ये अशीच एकी आहे.ते सर्व पक्षात असून एक असतात आणि आपण एकाच पक्षात व ऐका बापाचे असून अनेक असतो.आरक्षणाच्या मुद्यावर आजही ब्राह्मण कडाडून विरोध करतात.मग तो भाजपचा ब्राह्मण असो, कॉग्रेसचा ब्राह्मण असो, कम्युनिस्ट ब्राह्मण असो, राष्ट्रवादीचा ब्राह्मण असो, की सेनेचा ब्राह्मण असो, किंव्हा कोणताही ब्राह्मण असो.सर्वांचा आरक्षणाला विरोध आहे. आरक्षण भिक आहे…❓
काय आरक्षण लाचारी आहे…❓जर असे असते तर, ब्राह्मणांनी आरक्षणाला विरोध का केला असता ❓यावर शिकलेल्या लोकांनी विशेषत: आरक्षणाच्या लाभार्थी लोकांनी गंभीरपणे विचार करायला हवा.तर, अँड गणपत अभ्यकरांनी आरक्षणाला विरोध केला.राजर्षी छत्रपति शाहू महाराज हे कर्ते सुधारक होते,नुसते बोलके सुधारक नव्हते.शिवाय ते फॉरेन रिटर्न होते.गणपत अभ्यंकरांचा बामणी कावा त्यांच्या लक्षातआला.राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी गणपत अभ्यंकरांना घोड्याच्या पागेत (तबेल्यात) नेले.
त्या ठिकाणी खुप घोडी होती.
सर्व घोडी आरामाने आपल्या स्वताच्या हिस्याचे तोब-यात दिलेले चंदी (हरबरे-चने) खात होती. राजर्षी छत्रपति शाहू महाराज व गणपत अभ्यंकर हे सर्व पहात होते.तेवड्यात राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी तेथील मोतद्दारांना घोड्याच्या तोंडाचे तोबरे सोडून त्यातील चने/हरबरे खाली सतरंजीवर टाकायला सांगीतले.
नंतर सर्व घोडी मोकळी सोडायला सांगीतले. हे प्रात्यक्षिक अँड गणपत अभ्यंकर निमूटपणे पहात होते.जसेही मोतद्दारांनी सर्व घोडी मोकळ्या सोडून दिल्या,
तेव्हा जी तगडी घोडी होती,
शक्तिशाली घोडी होती,
धडधाकट निरोगी घोडी होती,
मोठी घोडी होती… ती सर्व घोडी सतरंजीवर सर्वांसाठी ठेवलेल्या चने/हरब-यावर तुटून पडली आणि जी कमजोर घोडी होती, आजारी कुपोशीत घोडी होती…..
ती लांबच उभी होती आणि पाहत होती. मोठी ताकतवान घोडी तगडी मस्तवाल घोडी खाताना सुद्धा व्यवस्थीत खात नव्हती.
ती तोंडाने हरबरे खायची व मागच्या पायाने लाथा झाडायची (मारायची) जेनेकरुन कमजोर, कुपोशीत घोड्यांने यात घुसू नये.
त्यामुळे कमजोर लहान घोड्यांनी त्या तगड्या घोड्याच्या गर्दीत न घुसण्याचा विचार केला.
कारण त्या तगड्या मस्तवाल घोड्यांच्या गर्दीत घुसलो तर,
हरब-या ऐवजी लाथाच खाव्या लागतील. असा विचार करुन बिचारी गरीब, अशक्त, कुपोषीत घोडी आपल्या हिस्याचे चने-हरबरे मोठी तगडी घोडी खात इतरस्थ पसरविताना निमूटपने पहात होती.
तेव्हा राजर्षी छत्रपति शाहू महाराज त्या कमजोर घोड्यांकडे बोट दाखवून अँड गणपत अभ्यंकराला म्हणाले,
” अभ्यंकर या कमजोर घोड्याचे काय करु ❓त्यांना गोळ्या घालू
काय ❓असे होणार हे मला अगोदरच माहीत होते. म्हणून मी प्रत्येकाचा वाटा प्रत्येकाच्या तोडाला बांधला होता.
जेणे करुन दुसरे कोणी कमजोर गरीब कुपोशीतांच्या हिस्यातील खाद्यामधे तोंड घालनार नाही “.
याला म्हणतात आरक्षण.
यावर गणपत अभ्यंकराने मान खाली घातली.
त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. त्यानंतर राजर्षी छत्रपति शाहू महाराज अभ्यंकराला म्हणाले,
” अभ्यंकर, जाती मानसात नसतात,जनावरात असतात.
परंतु तुम्ही जनावरांची व्यवस्था माणसाला लागू केली आणि मी मानसाची व्यवस्था जनावरांना लागू केली.” यावर अभ्यंकर चिडीचूप झाले.
त्यांचे आडनाव अभ्यंकराऐवजी भयंकर असायला हवे होते.
फुले-शाहुंची योजना बाबासाहेबांनी सविधानात अंतर्भुत केली,परन्तु गणपत अभ्यंकराची अवलाद शासकीय- प्रशासकीय “पावर” मधे असल्याने ६६ वर्षा नंतरही आरक्षण विषयक ब्राह्मणी मानसिकतेत फरक पडलेला नाही._
(संदर्भ “लोकराजा-राजर्षी छत्रपति शाहू महाराज. ” लेखक – डी. आर. ओहोळ.)