आदिवासी कंवर जमातीच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन कुवारीमाता करणारा नराधम कोण?

आदिवासी कंवर समाज सेवा समितीचे प्रमुख मार्गदर्शन मा.डॉ. मेघराज कपूर यांचा समाज आक्रोश आंदोलन.
मा.डॉ. मेघराज कपूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पिढीत अल्पवयीन लैंगिक अत्याचार मुलगी मागील एक वर्षांपासून कोरचीतील एका व्यवसायीकाकडे घरकाम करीत होती.आरमोरी येथे सोनोग्राफी टेस्ट करुन गर्भधारणा असल्याचे स्पष्ट झाले असता अत्याचार पिढीत अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकावर दबाव आणून गर्भपात करण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते सफल झाले नाही.पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भादंवि ३७६(२)(जे)सह प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्च्युअल ओफेन्सेस
(पोक्सो) कायद्याच्या कलम ४अन्वये कोरची पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोणाच्या दबावाखाली येऊन हे करण्याचा प्रयत्न झाला हे स्पष्ट झाले नाही. मात्र नराधम हा एका राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्याचा जवळचा नातेवाईक असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.त्यामुळे पोलीस यंत्रणा त्या पिढीतेला न्याय मिळवून देणार काय हा कळीचा मुद्दा आहे.जर हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला तर आदिवासी नारी शक्ती संघटना आणि आदिवासी कंवर समाज सेवा समितीचे सोबतच जिल्ह्यातील आदिवासींच्या सामाजिक संघटना उलगुलान करणार आहेत.
कोव्हिड१९च्या लाँकडाऊन काळात मार्चमध्ये कोरचीतील अल्पवयीन आदिवासी मुलीवर एका नराधम ग्रामसेवकांनी लैंगिक अत्याचार केला होता.मात्र पैसाच्या जोरावर कोरचीतील आदिवासी मुलीला न्याय मिळाला नाही.
आदिवासींच्या न्याय हक्काचे तुनतुने वाजविणारे नेते आणि स्थानिक लोकप्रतिनिधी झोपेत आहेत काय?असा जनाक्रोश होतोय.