महाराष्ट्र हेडलाइन

आता हॉलमार्किंग अनिवार्य “ग्राहकांना मिळणार आता खरं सोनं.” अ.भा. ग्राहक पंचायत भद्रावती यांच्या मागणीला यश

Summary

सर्व सोन्याच्या दुकानांमध्ये सोने आणि इतर दागिन्यांची खरेदी-विक्री चे व्यवहार होतात. हे व्यवहार करतांना दुकानदार *कॅरेटोमिटर* चा उपयोग न करता व्यवहार करतात. कॅरेटोमिटर सोन्याची शुद्धता आणि परिमाण दर्शवत असतो. ग्राहकांच्या जवळुन सोने आणि इतर दागिने विकत घेत असतांना दुकानदार *डाग* […]

सर्व सोन्याच्या दुकानांमध्ये सोने आणि इतर दागिन्यांची खरेदी-विक्री चे व्यवहार होतात. हे व्यवहार करतांना दुकानदार *कॅरेटोमिटर* चा उपयोग न करता व्यवहार करतात.
कॅरेटोमिटर सोन्याची शुद्धता आणि परिमाण दर्शवत असतो.
ग्राहकांच्या जवळुन सोने आणि इतर दागिने विकत घेत असतांना दुकानदार *डाग* च्या नावाखाली १०% रक्कम कापुन सोने विकत घेतात. पणं जेव्हा हेच दुकानदार सोने किंवा इतर दागिने स्वत:त्या दुकानात विकतात तेव्हा सोने मात्र कसेही असो ते २४ कॅरेट च्या किंमतीतच विकतात. दुकानात कॅरेटोमिटर नसल्यामुळे ग्राहकांना दुकानदारांवर डोळे बंद करून विश्वास ठेवावा लागतो आणि सोने व इतर दागिने विकत घ्यावे लागते आणि ईथेचं ग्राहकांची फसवणूक होते. हिच फसवणूक थांबवण्यासाठी सर्व ज्वेलरी दुकानात कॅरेटोमिटर लावणे तसेच सोन्याच्या व इतर दागिन्यावर हॉलमार्किंग असणे अनिवार्य असले पाहीजे. याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती यांनी *भारतीय मानक ब्यूरो दिल्ली* यांचे कड़े दिनांक ०१ ऑगस्ट २०१८ ला करण्यात आली होती. त्यानंतर या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारने ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ऍक्ट २०१६ अंतर्गत हॉलमार्किंग ऑफ गोल्ड ज्वेलरी ऑर्टिफॅक्टस ऑर्डर २०२० लागु केले आणि १ जुन २०२१ पासुन सोन्याच्या दागिन्यांसोबत इतर सर्व वस्तुंवर हॉलमार्किंग अनिवार्य करने आणि ज्वेलर्सनी हॉलमार्किंग सेंटरमध्ये स्वत:ची नोंदनी करने बंधनकारक केले आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती सन २०१८ पासून सतत पाठपुरावा केला. याचे सर्व श्रेय तत्कालीन सचिव अविनाश जोशी आणि सोबत वसंत वर्हाटे, वामन नामपल्लीवार, पुरूषोत्तम मत्ते, शेखर घुमे, गुलाब लोणारे, गोपिचंद कांबळे, उत्तम घोसरे यांना जाते. अशी माहिती अ.भा. ग्राहक पंचायत भद्रावतीचे सहसचिव प्रविण चिमुरकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *