आज गडचिरोलीत आयुष् निदान व उपचार शिबीर

गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागाचे आयुष कक्षेत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अनिल रुडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज बुधवार दिनांक २४/फेब्रृवारी , सकाळी ९ वाजता पासून दुपारी २ वाजेपर्यंत मोफत आयुष निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
या शिबिराला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतिश सोळंके, जिल्ह्यातील सर्व आयुष अधिकारी,, डॉ. रोकडे, डॉ. उपकुळे, डॉ. आत्राम, डॉ. कोहळे, डॉ. ठाकूर, डॉ. राजधानी शेख, योग शिक्षक पेशट्टीवार, उपस्थित राहून उपचारार्थ मार्गदर्शन करणार आहेत..
या आयुष शिबिरात वेगवेगळ्या आजारावर मार्गदर्शन आणि उपचार करण्यात येणार आहे. . या आरोग्य शिबिरात गरजूंना सहभागी होऊन आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा. त्यासोबतच जवळपास असलेल्यांना माहिती देऊन सहकार्य करावे.. असे आवाहन डॉ रुडे यांनी केले आहे.