BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती पत्रकार दिनाने ग्रामिण पत्रकार संघा व्दारे साजरी

Summary

नागपूर कन्हान : – आद्य “दर्पण ” मराठी वृत्तपत्राचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची ६ जानेवारी ला जयंती ग्रामिण पत्रकार संघ कन्हान व्दारे पत्रकार दिन म्हणुन थाटात साजरी करण्यात आली. मराठी वृत्तपत्राचे दर्पणकार व पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या […]

नागपूर कन्हान : – आद्य “दर्पण ” मराठी वृत्तपत्राचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची ६ जानेवारी ला जयंती ग्रामिण पत्रकार संघ कन्हान व्दारे पत्रकार दिन म्हणुन थाटात साजरी करण्यात आली.
मराठी वृत्तपत्राचे दर्पणकार व पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्य ग्रामिण पत्रकार संघ कन्हान व्दारे बुधवार दि.६ जाने वारी ला तारसा रोड येथील कार्यालयात ग्रामिण पत्र कार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, कन्हान अध्यक्ष रमेश गोळघाटे, कार्याध्यक्ष अजय त्रिवेदी यां च्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जेष्ठ पत्रकार अजय त्रिवेदी हयांनी आद्य वृत्तपत्र दर्पण व दर्पणकार आचार्य जांभेकर यांच्या मौल्यवान कार्या विषयी मार्ग दर्शन केले. याप्रसंगी पत्रकार मोतीराम रहाटे, अजय त्रिवेदी, रमेश गोळघाटे, एन एस मालविये सर, कमल सिंह यादव, सुनिल सरोदे, शांताराम जळते, रविंद्र दुपारे, गणेश खोब्रागडे, रोहीत मानवटकर, ऋृषभ बावनकर आदीचे पुष्प व भेट वस्तुने सत्कार करून बाळशास्त्री जांभेकर यांची यजंती पत्रकार दिन म्हणुन थाटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचा लन सुनिल सरोदे यांनी तर आभार ऋृषभ बावनकर यांनी व्यकत केले.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *