आकाश गजबे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशउपाध्यक्ष पदी निवड..
Summary
आकाश गजबे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशउपाध्यक्ष पदी निवड.. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नागपुर जिल्हाध्यक्ष पदाचा ४ वर्ष उत्तम कारभार सांभाळल्यानंतर माजी मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते मुंबई येथील पक्ष कार्यालयात आकाश गजबे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस […]
आकाश गजबे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशउपाध्यक्ष पदी निवड..
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नागपुर जिल्हाध्यक्ष पदाचा ४ वर्ष उत्तम कारभार सांभाळल्यानंतर माजी मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते मुंबई येथील पक्ष कार्यालयात आकाश गजबे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशउपाध्यक्ष पदी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी नियुक्ती केली…
माजी गृहमंत्री अनिल देशमुख व युवा नेते सलिल देशमुख यांचे अतिशय निवटवर्तिय समजले जाणारे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस नागपुर जिल्हा ग्रामिणच्या अध्यक्षपदाची गेल्या ४ वर्षांपासुन उत्तम जबाबदारी पार पाडल्याची व संघटना प्रत्येक तालुक्यात पोहचविल्याची पोचपावती म्हणुन आकाश गजबे यांना पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशउपाध्यक्ष पदी माजी मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार सुप्रिया सुळे, युवा नेते तथा जिल्हा परीषद सदस्य सलिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार प्रकाश गजभिये, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांचे आकाश गजबे यांनी आभार व्यक्त केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज गुजर, कार्याध्यक्ष राजु राऊत, जिल्हा नियोजन समिती सदस्य चंद्रशेखर चिखले, प्रदेशमहासचिव अविनाश गोतमारे, युवक नागपुर शहराध्यक्ष शैलेंद्र तिवारी, जिल्हाध्यक्ष आशिष पुंड, सामाजीक कार्यकर्ते दुर्गाप्रसाद पांडे, कोंढाळीचे उपसरपंच स्वप्निल व्यास, पंचायत समिती सदस्य संजय डांगोरे, युवक जिल्हामहासचिव नितीन ठवळे, अर्बन सेल अध्यक्ष श्रीकांत शीवनकर, तालुकाध्यक्ष प्रशांत खंते, काटोल शहराध्यक्ष गनेश चन्ने, प्रदेशउपाध्यक्ष रवी पराते, अल्पसंख्यांक अध्यक्ष सोहेल शेख, विवेक लिखार, रझा पठान, राहुल डोंगरे, प्रज्वल धोटे, रुपेश बुरडकर, आदींनी स्वागत करुन भावी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.