अभाविप चा परीक्षा नियंत्रकांना घेराव

रा. तु. म. नागपूर विद्यापीठा द्वारे २५ मार्च पासून हिवाळी २०२० च्या ऑनलाइन परीक्षा सुरु झाल्या आहेत. परीक्षेत विद्यार्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या विषयात अ.भा.वि.प ने एकदा विद्यापीठाला निवेदन दिले, अनेक वेळा विद्यापीठासोबत संपर्क साधुन चर्चा करून मार्ग काढण्याची विनंती देखील केली. परंतु काही सकारात्मक कार्यवाही विद्यापीठाद्वारे केली गेली नाही . म्हणून अ.भा.वि.प नागपूर महानगराद्वारे रा.तु.म नागपूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक प्रफुल्ल साबळे यांना त्यांच्या दालनात घेराव घालण्यात आला व पुढील सर्व मागण्या विद्यापीठाला करण्यात आल्या.
२५ तारखेला ज्यांचे पेपर होऊ शकले नाही त्यांच्या पेपर घेण्या संबंधित विद्यापीठ कधी सूचना देणार ? C-MAT परीक्षा व B.Com विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच दिवशी येत आहेत त्या संदर्भात विद्यापीठ काय करणार, परिक्षे दरम्यान Server Down ची समस्या विद्यार्थ्यांना येत आहे. विद्यार्थ्यांना Login साठी बराच वेळ वाट पाहावी लागत आहे, Google Location चालू असताना देखील वारंवार Google Location ची मागणी web base द्वारे करण्यात येते. जे विद्यार्थी तांत्रिक कारणांमुळे परीक्षेपासून वंचित राहिले आहे त्यांचे नियोजन विद्यापीठ काय व कसे करणार आहे, परीक्षेच्या पहिल्या पेपर मध्ये तांत्रिक अडचणी आल्या त्याला जवाबदार कोण , परीक्षा घेणाऱ्या प्रोमार्क एजेंसी वर करवाई अजून पर्यंत का करण्यात आलेली नाही, एका अभ्यास मंडळा मधील विद्यार्थ्यांना दुसऱ्या अभ्यास मंडळाचे प्रश्न पत्रक येतात, आज दि. 31 मार्च रोजी झालेल्या बी.कॉम 5th सेम च्या परिक्षे करिता 2 मिनिटांचा वेळ मिळाला याला जबाबदार कोण व त्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठ काय नियोजन करणार आहे.
या सगळ्या समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सगळ्या मुद्यांवर विद्यापीठाने तात्काळ कारवाई करावी व प्रोमार्क कंपनी चा पुढील सत्रात करार रद्द करावा अशी मागणी अ.भा.वि.प द्वारे करण्यात आली या सर्व मागण्या मान्य न झाल्यास अ.भा.वि.प अजून तीव्र प्रकारे आंदोलन करेल असे प्रतिपादन महानगर मंत्री करण खंडाळे यांच्या द्वारे करण्यात आले व सर्व मागण्यांवर त्वरित कार्यवाही करू व कुठलाही विद्यार्थी परीक्षे पासून वंचित राहणार नाही असे आश्वासन रा.तु.म नागपूर विद्यापीठ परीक्षा नियंत्रक प्रफुल्ल साबळे यांच्या द्वारे देण्यात आले.