अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामेकरून नुकसान भरपाई द्या ः खासदार हेमंत पाटील
मागील आठवडाभर हिंगोली लोकसभा क्षेत्रातील अनेक भागात झालेल्या पावसामुळे अतिवृष्टी झाली असून यामुळे शेतकर्यांच्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई पासून एकही शेतकरी वंचित राहिला नाही पाहिजे अशी मागणी खासदार हेमंत हेमंत पाटील यांनी केली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून सगळीकडे दमदार पाऊस होत आहे. हिंगोली लोकसभा क्षेत्रात सुद्धा मागील १० दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे यामुळे अनेक हिंगोली लोकसभा मतदार संघातील प्रमुख कयाधू, पूर्णा, पैनगंगा नद्यांना आलेल्या पूरामुळे हिंगोली, सेनगाव, कळमनुरी, वसमत. औंढा (ना), आणि किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर, उमरखेड, महागाव या तालुक्यातील नद्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात खरीप मूग, उडीद, कापूस हळद, सोयाबीन या पिकाचे नुकसान झाले असून काही भागात सोयाबीन पिकांवर पाने पिवळी होणार्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी प्रशासनाला आणि कृषी विभागाला अश्र्या सूचना केल्या आहेत कि, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे करण्यात येऊन नुकसानग्रस्त शेतकर्याना नुकसान भरपाई देण्यात यावी.अगोदरच कोरोनाच्या संसर्गाने हैराण असलेल्या शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप पिकाचा घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून घेतला गेला आहे. अतिवृष्टीसोबतच काही औंढा नागनाथ तालुक्यात ढगफुटीचे प्रकारही घडले असून यामुळे एकाच शेत जमिनीवरच्या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे तर काही वसमत तालुक्यातील चोंडी भागात राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे रस्त्यामुळे पाणी आडून पेरलेले पीक वाहून गेले आहे त्यामुळे अतिवृष्टीसोबतच सर्वच नुकसान ग्रस्त भागाची स्थानिक कर्मचार्यांमार्फत पाहणी करण्यात यावी असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.