अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा कोंढा कोसरा तर्फे आज दिनांक 19 मे ला कोंढा नगरीमध्ये गर्दीच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले.

एक दोन दिवस गावात निर्जंतुकीकरण केल्याने निर्जंतुकीकरण होणार नाही पण जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत कमी होत असतानाच कोरोना गेला या दृष्टिकोनाने गावकऱ्यांच्या तोंडावरचा माक्स खाली उतरलेला दिसतोय आणि मस्कचा वापर सामाजिक अंतर सुद्धा विसरल्यागत वाटते म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या कार्यकर्त्यांनी उद्देशून निर्जंतुकीकरण च्या कार्यक्रमाला पुढाकार घेतला आहे.
मास्क, सॅनिटायझर ,सामाजिक अंतर याची गरज आहे ते गावकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
त्यावेळी प्रेम लीचडे, महेश पंचभाई, युगल सेलोकर , गौरव माकडे , राहुल वंजारी , सतीश नेवारे , तीमीर माकडे , विषाल जिभकाटे , तुषार जिभकाटे साहील टेंभुरकर,आदित्य भुरे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वार्थी करमकर
महिला प्रतनिधी
तालुका तुमसर