BREAKING NEWS:
महाराष्ट्र

*सेवनिवृत्तीपर प्राचार्य राजेंद्र खाडे यांना निरोप*

Summary

प्राचार्य राजेंद्र खाडे , कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय,येनबोडी व जिल्हाध्यक्ष विजूक्टा, चंद्रपूर आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब वासाडे यांनी भुषविले.संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. देवानंद जी गुरू साहेब, संस्थेचे कार्याध्यक्ष मा.संजयराव वासाडे,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा […]

प्राचार्य राजेंद्र खाडे , कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय,येनबोडी व जिल्हाध्यक्ष विजूक्टा, चंद्रपूर आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब वासाडे यांनी भुषविले.संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. देवानंद जी गुरू साहेब, संस्थेचे कार्याध्यक्ष मा.संजयराव वासाडे,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ वैशालीताई वासाडे, संस्थेचे संचालक भाऊजी पाटील मोरे,बी.पी.एस च्या प्राचार्या परेरा मॅडम, सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी,व विध्यार्थी उपस्थित होते.प्राचार्य राजेंद्र खाडे यांनी मराठा सेवा संघाचे माध्यमातून, ओ बी सि चळवळीत, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन अश्या विविध क्षेत्रात मोलाचे प्रबोधनाचे व समाजसुधारणेचे कार्य केले अनेक होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी मदत व सहकार्य केले समाजातील गरीब लोकांना सुद्धा योग्य मार्गदर्शन केले समाजाचे आपण काही देणे लागतो या उदात्त भावनेने त्यांनी मोलाचे कार्य केले विजूक्ट या संघटनेचे ते चंद्रपूर जिल्ह्याचे ते अध्यक्ष असतांना त्यांनी बऱ्याच शिक्षकांच्या समस्या सोडविल्या अश्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेले प्राचार्य राजेंद्र खाडे यांना सर्वांनी कृतज्ञ भावनेने निरोप दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक श्री.बी. एम.बोढाले सर यांनी केले. सुत्र संचालन श्री एस. के. लोहे यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीमती गिरडकर मॅडम यांनी केले.

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
प्रा. शेषराव येलेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *