साटक येथे शेती शाळा प्रशिक्षण वर्ग संपन्न
नागपूर कन्हान : – तालुका कृषी अधिकारी कार्यालय पारशि वनी व्दारे साटक येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान गहु पीक अंतर्गत शेती शाळा प्रशिक्षण वर्गा चे आयोजन करून परिसरातील शेतक-यांना प्रगत शेती करण्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
पारशिवनी तालुका कृषी अधिकारी कार्यालया व्दारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत साटक येथे आयोजित एक दिवसीय शेती शाळा प्रशिक्षण वर्गात उपविभागीय कृषी अधिकारी रामटेक मा ए के मिसाळ यांनी शेतकऱ्यांना गट शेती तसेच विकेल ते पिकेल या संकल्पना विषयी मार्गदर्शन केले. कन्हान मंडळ कृषी अधिकारी जी बी वाघ यांनी कापुस पिकातील गुलाबी बोंड अळी निर्मूलन आणि फरदड न घेण्या विषयी सांगितले, जे बी भालेराव यांनी गहु पीक व्यवस्थापना विषयी माहिती दिली. ग्राम पंचायत साटक सरपंचा सौ सिमाताई उकुंडे यांनी सदर शेती शाळा व कृषी विभा गाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करित भविष्यात देखील साटक गावात अश्याच प्रकारे कृषी विभागाचे कार्य राहिल अशी मनक्षा व्यक्तत केली. उपस्थित शेत कऱ्यांनी याप्रसंगी आपले अनुभव आणि मनोगत व्यक्त केले. साटक चे कृषी सहायक के बी ठोंबरे यांनी प्रास्ताविकातुन कार्यक्रमाची रूपरेषा व उद्देशाची मांड णी केली. कृषी विभागाच्या वतीने विविध विषयांवर मार्गदर्शन करून चर्चात्मक माहिती देऊन तदंनतर गहु पिकात क्षेत्र भेट आणि जेवणाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सदर शेती शाळा प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमास उप विभागीय कृषी अधिकारी रामटेक श्री मिसाळ साहेब, कन्हान मंडळ कृषी अधिकारी श्री वाघ साहेब, कृषी पर्यवेक्षक श्री कुबडे साहेब, साटकचे कृषी सहाय्यक श्री के बी ठोंबरे, ग्राम पंचायत सरपंचा सौ सिमाताई उकुंडे, उपसरपंच श्री गजानन वांढरे, ग्राम पंचायत सद स्य श्री तरुण बर्वे, सौ सकुंतला मेश्राम तसेच गावातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता साटक चे प्रगतशील शेतकरी श्री आत्माराम उकुंडे, कृषी मित्र मंगेश भुते हयांनी विशेष सहकार्य केले.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535