महाराष्ट्र

सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील रुग्णालयाची इमारत नव्याने बांधण्याचा प्रस्ताव पाठवा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

Summary

मुंबई दि. 23 : मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित असणाऱ्या सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील रुग्णालयाची सध्याची इमारत जीर्ण झाली असून मोडकळीस आली आहे. या इमारतीच्या जागी 500 खाटांची सुविधा असणारी नवी इमारत बांधण्याचा प्रस्ताव तातडीने पाठवावा असे निर्देश […]

मुंबई दि. 23 : मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित असणाऱ्या सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील रुग्णालयाची सध्याची इमारत जीर्ण झाली असून मोडकळीस आली आहे. या इमारतीच्या जागी 500 खाटांची सुविधा असणारी नवी इमारत बांधण्याचा प्रस्ताव तातडीने पाठवावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले.
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुविधांमध्ये वाढ करण्याबाबत मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने, सांगली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता माने, कार्यकारी अभियंता रोकडे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सांगली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेत 2018 पासून वाढ  झाल्याने या महाविद्यालयात संलग्न असणाऱ्या रुग्णालयातील खाटांची संख्या मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या निकषाप्रामणे वाढविणे आवश्यक होते. ही त्रुटी राहू नये या दृष्टीने नव्याने रुग्णालय इमारत बांधण्याचा प्रस्ताव मागविण्यात आलेला आहे. याच रुग्णालय परिसरात दोनशे निवासी डॉक्टरांसाठी वसतिगृह इमारत बांधण्याचा प्रस्तावही पाठविण्यात यावा, शवविच्छेदनगृहाची इमारत नव्याने उभारण्यात यावी त्याचप्रमाणे नव्याने उपलब्ध होणाऱ्या तीनशे खाटांसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव पाठविण्यात यावा असे निर्देशही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी आजच्या बैठकीत दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *