रेती व्यवसायाच्या वर्चस्वातुन तुमसरात गोळीबार
तुमसर तहसील न्यूज रिपोर्ट:-तुमसर तहसील मध्ये सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत रेती माफिया चा खेल होत आहे, दिवस-रात्र बावनथडी नदितुन रेती माफिया च्या माध्यमातून नागपूर व विभिन्न शहरात जात असते.पोलीस योध्दा न्यूज नेटवर्कशोध घेत आहे.
राजस्व विभागाचा महसूल कोट्यवधी संख्याने दुर्मिळ होत आहे.
हे रेतीचे टिप्पर महसुली विभाग कि पुलीस विभागाच्या आशिर्वादाच्या मार्फत जात आहेत याला कोनत्या विभागाचा अधिकारी जवाबदार आहे हे शासनाने पाहने अनिवार्य आहे.
अशिच एक तुमसर शहरातील घटना घडली आहे.
तुमसर येथे भरदुपारी देशी कट्यातुन गोळी झाडून एका सराईत बसलेल्या रेती माफिया संतोष चंदन दहाट (२६रा.आंबेडकर वार्ड)हा रेतिच्या धंद्यात वाढु नये,शेख नहिम याने सहा लोकांना संतोष दहाट ला मारण्यासाठी प्रवृत्त केले.
दिनेश उर्फ डाल्या मधुकर मेश्राम ,शुभम उर्फ झब्या देवेंद्र कटकवा,भुपेद्र मोहन गिरोलकर,मनोज देवीदास कान्हेकर,गप्पु साडेकर,कालु माटे व नहिम शेख हे सर्व तुमसर अशी संशयित आरोपी ची नावे आहेत.
याप्रकरणी दिनेश,शुभम,मनोज ह्या तिघांना पोलीसांनी अटक केली.
याप्रकरणाची सौरभ नंदकिशोर माने याने तुमसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.पोलिसांनी तपास गाडी फिरवुन तिघांना ताब्यात घेतले.
सहायक पोलीस निरीक्षक बानबले यांनी सात जनाविरुध्द भा.द.वि.३०७,१४३,१४७,१४८,१४९,१२०ब आणि भारतीय हत्यार कायदा ३/१५गुन्हा दाखल करण्यात आला .२५ जानेवारीला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
:-९७६५९२८२५९