BREAKING NEWS:
महाराष्ट्र

रागिनी सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन

Summary

खापरखेडा(दिवाकर घेर): अण्णामोड परिसरात रागिणी फाउंडेशनच्या वतीने १ जानेवारी शुक्रवारला रागिनी सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अमरचंद जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार दिवाकर घेर, खापरखेडाचे माजी सरपंच धनराज डहेरिया, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र इंगोले […]

खापरखेडा(दिवाकर घेर):
अण्णामोड परिसरात रागिणी फाउंडेशनच्या वतीने १ जानेवारी शुक्रवारला रागिनी सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अमरचंद जैन यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पत्रकार दिवाकर घेर, खापरखेडाचे माजी सरपंच धनराज डहेरिया, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र इंगोले गुलाब छावरे, कपिल वानखेडे, श्रीराम सातपुते, दिलीप फाले, तेजस काळे आदि आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरवातीला शिवाजी महाराज, गाडगे महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून द्विप प्रजवलीत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक रागिनी फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रदीप खांबलकर यांनी केले तर आभार नरेश खांबलकर यांनी मानले. वाचनालयात साहित्यिक, कायदेविषयक, कथा, विविध क्षेत्राशी संबंधित पुस्तके सर्वसामान्य नागरिकांना वाचायला मिळणार आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर खांबलकर, रुमा खांबलकर, ज्योती फाले, लता काळे, शालिनी खांबलकर आदींचे विशेष सहकार्य लाभले
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज चॅनेल
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *