…यापुढे अशी घटना खपवून घेतली जाणार नाही, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा शिवसेनेला इशारा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काटेकर यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे.कोणत्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खालच्या भाषेत टीका करू नये. मात्र फडणवीस दांपत्यावर अश्लील भाषेत टीका केली गेली पण आम्ही कोणाला मारहाण केली नाही.
त्यामुळे यापुढे अशी घटना खपवून घेतली जाणार नाही असा इशारा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी शिवसेनेला दिलाय.प्रवीण दरेकर हे शुक्रवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते.या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दरेकर पुढे बोलताना म्हणाले की, राज्यपालांना विमान परवानगी नाकारणे हा पोरखेळ आहे. घटनात्मक पदाचा अपमान आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे गेलेली परवानगीची फाइल मुद्दाम बाजूला ठेवल्याचा आरोप त्यांनी केला.
सत्ताधारी तीन पक्षांची एकाच विषयावर तीन वेगवेगळी विधाने असतात . मतपत्रिकेवर मतदान घेण्यावरून हे पुढे आले आहे. भाजप सोडून कोणीही जाणार नाही. असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपले कार्यकर्ते सरपंच व्हावे यासाठी ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत निवडणूकीनंतर घेतली, हे चुकीचं आहे.सरकारने शेतकऱ्यांची वीज तोडण्यास सुरवात केलीय. याविरोधात आम्ही रान पेटवू.
सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही. पुण्यातील तरुणी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सत्यता पुढे आली पाहिजे अशी मागणी दरेकरांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्नेह कायमच सत्तेसोबत असते. ते त्यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर सिद्ध झाल्याची टीका त्यांनी केली. त्याचबरोबर साखर कारखान्यांना दिलेल्या थकहमीची चौकशी व्हावी अशी मागणीही प्रविण दरेकर यांनी केली आहे
सचिन सावंत मंगळवेढा
9370342750