महाराष्ट्र

मौजा वाठोडा येथील भूसंपादन प्रकरणाची तपासणी करुन कार्यवाही करावी – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

Summary

मुंबई, दि. 16 : मौजा वाठोडा खसरा येथील शेत जमिनीचे भूमीसंपादन प्रकरण तसेच नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयाने सिम्बायोसिस या शैक्षणिक संस्थेला दिलेल्या इमारत संदर्भातील प्रकरणाबाबतची कार्यवाही त्वरीत करावी. या प्रकरणाची शहानिशा करुन याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचना विधानसभा […]

मुंबई, दि. 16 : मौजा वाठोडा खसरा येथील शेत जमिनीचे भूमीसंपादन प्रकरण तसेच नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयाने सिम्बायोसिस या शैक्षणिक संस्थेला दिलेल्या इमारत संदर्भातील प्रकरणाबाबतची कार्यवाही त्वरीत करावी. या प्रकरणाची शहानिशा करुन याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 मौजा वाठोडा येथील नकाशाच्या मंजूरीसंदर्भात प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने विधानभवन येथे  बैठक झाली. यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, नागपूरचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, आमदार विकास ठाकरे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, महानगरपालिका आयुक्त श्री.ठाकरे, आयुक्त राधाकृष्ण पल्लवी, नगरविकास विभागाचे उपसचिव सतीश मोघे, पी.जी. जाधव, ‘एमएमआरडीए’चे अधिकारी उपस्थित होते.

 बैठकीत अर्जदारांनी आपल्या समस्या मांडून सिम्बायोसिस संस्थेने सादर केलेली कागदपत्रे, त्यानुसार नकाशाला दिलेली मंजूरी याबाबत फेरतपासणी करुन चौकशी करावी, अशी मागणी केली. या प्रकरणाच्या वस्तुस्थितीची तपासणी करुन योग्य कार्यवाही करावी, अशा सूचनाही विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले यांनी दिल्या.

यावेळी नागपूरचे नगरसेवक संजय महाकाळकर, वेदप्रकाश आर्य, प्रफुल्ल गुडघे, गुटेश्वर पेठे, जि.प. सदस्य अवंतिका लंकुरवाळे, निलिमा घुगे, साईश पाध्ये व अन्य सिम्बोसिसचे सदस्य उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *