मित्रानेच केली अपहर्त शुभम फुटाणेची हत्या

शनिवार 13 फेब्रुवारीला रात्री 7:30 वाजता दरम्यान घुग्गुस येथील अपहर्त शुभम फुटाणे ची हत्या झाल्याचे उघडकीस आले.
शनिवार 13 फेब्रुवारीला आरोपी गणेश साईनाथ पिंपळशेंडे (24) रा. ड्रिमलँड सिटी, घुग्गुस यास सायंकाळी 6:22 वाजता कलम 302,201,364 गुन्हा दाखल करून घुग्गुस पोलिसानी अटक केली. आरोपी गणेश पिंपळशेंडे यांनी शुभम फुटाणेची हत्या केल्याची कबुली दिली व त्याचे प्रेत घुग्गुस चंद्रपूर मार्गाच्या वळणरस्त्यावर झूडपातील नाल्यात फेकून राखडीने बुझाविले असल्याचे सांगलीतले त्यामुळे पोलिसानी त्याला घटनास्थळावर नेले. ही माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली त्यांनी घुग्गुस पोलीस स्टेशन गाठले तर ही माहिती वाऱ्या सारखी पसरताच भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विवेक बोढे व राजकीय नेत्यांनी, नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे, सहा. पोलीस निरीक्षक मेघा गोखरे, गुन्हे पथकाचे सहा.फौजदार गौरीशंकर आमटे, सचिन बोरकर, सुधीर मत्ते, रंजित भुरसे, सचिन डोहे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून शव विच्छेदना साठी चंद्रपूर येथे पाठविले. आज
रविवार 14 फेब्रुवारीला सकाळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मृतक शुभमच्या कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली व विचारपूस करीत संतावना दिली. आज रविवार 14 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता रामनगर येथून शुभम फुटाणे हत्याकांड निषेधार्थ कॅॅंडल मार्च घुग्गुस वासियांच्या वतीने काढण्यात येत आहे.
शुभम दिलीप फुटाणे (25) रा. रामनगर, घुग्गुस याचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी काही महिन्यापूर्वी घुग्गुस पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली होती तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 364 गुन्हा दाखल करण्यात आला होता
अपहरणाचा दिवशी शुभम हा दुचाकीने जेवण करायला जातो म्हणून घरून निघून गेला. रात्री 10:30 वाजता दरम्यान शुभमच्या मोबाईल वरून वडील दिलीप फुटाणे यांना अपहरण करत्याचा फोन आला व त्याने दोन दिवसात 30 लाख रुपये देण्याची मागणी केली. 30 लाख रुपये नाही दिले तर तुझ्या मुलाचा खून करतो अशी धमकी दिली.
त्यामुळे त्यांनी रात्री घुग्गुस पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली रात्री उशिरा 1:30 वाजता अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
घुग्गुस पोलिसांनी तपास चक्र जलद गतीने फिरविले दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी डॉ. दास हॉस्पिटल जवळ शुभमची दुचाकी क्र. एमएच 34 एएस 6815 ही रस्त्यालगत पडलेल्या अवस्थेत आढळली होती.
शुभम फुटाणे चे हत्याकांड कशा साठी झाले, कोणत्या कारणाने त्याची हत्या करण्यात आली, हत्येत किती आरोपीनाचा सहभाग असणार हे सध्या गुलदस्त्यात आहे.
पोलीस तपासाअंती या हत्या कांडाचा उलगडा होणार आहे.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर