महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अभिवादन
Summary
पुणे, दि.७ : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथील जेतवन बुद्ध विहारातील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी इंदापूर नगरपरिषदेच्या महिला विकास व बालकल्याण समितीच्या […]
पुणे, दि.७ : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथील जेतवन बुद्ध विहारातील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी इंदापूर नगरपरिषदेच्या महिला विकास व बालकल्याण समितीच्या सभापती राजश्री मखरे यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी पंचशील व त्रिशरण घेऊन धम्मपुजा करण्यात आली.
यावेळी नगरपरिषदेचे आजी माजी पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह अनुयायी उपस्थित होते.