महाराष्ट्र

… बर्ड फ्ल्यू खबरदारी साठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र दक्षता पथक

Summary

सोलापूर – देशात सध्या बर्ड फ्ल्यू चा प्रादुर्भाव सुरू आहे राज्यात अद्याप कुठेही त्या रोगाची पक्षांना बाधा झालेली नाही तरीही खबरदारी चा उपाय म्हणून प्रत्येक तालुक्यात पशुवैदकिय अधिकार्यांचे दक्षता पथक तयार करण्यात आलेचे माहिती जि.प पशुसंवर्धन अधिकारी डॉ नवनाथ नरळे […]

सोलापूर – देशात सध्या बर्ड फ्ल्यू चा प्रादुर्भाव सुरू आहे राज्यात अद्याप कुठेही त्या रोगाची पक्षांना बाधा झालेली नाही तरीही खबरदारी चा उपाय म्हणून प्रत्येक तालुक्यात पशुवैदकिय अधिकार्यांचे दक्षता पथक तयार करण्यात आलेचे माहिती जि.प पशुसंवर्धन अधिकारी डॉ नवनाथ नरळे यांनी दिली .

साथीच्या आजारांची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने पुर्वतयारी केली आहे त्यामुळे दुर्देवाने प्रादुर्भाव झाल्यास आळा घालणे लवकर शक्य होईल असा विश्वास डाॅ नरळे यांनी व्यक्त केला सोलापूर जिल्हा भरात या रोगाचे एक प्रकरण दिसून आल्याचे स्पष्ट केले परभणी येथे काही दिवसांपूर्वी कोंबड्यांचा मृत्यू झाला सोलापूर लगतच्या लातुर जिल्ह्यात 350 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला त्या कोंबड्यां कशामुळे मरण पावल्या हे अद्याप सिद्ध झाले नाही

जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनचे पथक नियुक्त करण्यात आले आहे
पशुसंवर्धन उपआयुक्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी त्यासाठी विशेष नियोजन केले आहे तालुकास्तरीय पथकांचा बर्ड फ्ल्यू संदर्भातील दैनंदिन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे संसर्गाची लक्षणे आढळल्यास त्वरित पथकास आवश्यक ती औषधे व साधनसामग्री देण्यात येणार असल्याचे डॉ नरळे यांनी सांगितले

सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *