BREAKING NEWS:
महाराष्ट्र

पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणीची माघी यात्राही ‘या’ पध्द्तीनेच साजरी होण्याची शक्यता? पंढरपूर ब्रेकिंग! कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन तीन दिवस बंद राहणार

Summary

कोरोनामुळे अख्खा भारत देश लॉकडाऊन झाल्याने धार्मिक स्थळे, मंदिरांचे दरवाजे भाविकांना दर्शनाकरिता बंद करण्यात आले. 8 ते 9 महिने मंदिरे बंद राहिली. त्यामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीचे चैत्री, आषाढी व कार्तिकी हे तीन महत्त्वाचे यात्रा सोहळे रद्द करीत प्रतीकात्मक स्वरूपात साजरे […]

कोरोनामुळे अख्खा भारत देश लॉकडाऊन झाल्याने धार्मिक स्थळे, मंदिरांचे दरवाजे भाविकांना दर्शनाकरिता बंद करण्यात आले. 8 ते 9 महिने मंदिरे बंद राहिली. त्यामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीचे चैत्री, आषाढी व कार्तिकी हे तीन महत्त्वाचे यात्रा सोहळे रद्द करीत प्रतीकात्मक स्वरूपात साजरे करण्यात आले.

अद्यापही राज्यातील कोरोनाचे संकट टळलेले नसल्याने 23 फेब्रुवारी रोजी येणार्‍या माघी यात्रेबाबतही सध्या संभ्रम आहे.

दरम्यान, शासनाने 28 फेबु्रवारीपर्यंत लॉकडाऊन वाढविल्यानंतर माघी यात्रेबाबत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे स्थानिक व्यापारी, भाविकांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोरोना संकटामुळे गेले संपूर्ण वर्ष वारकरी संप्रदायासाठी काळे वर्ष ठरले होते. गेल्यावर्षी माघी यात्राच फक्त साजरी झाली. मार्चमध्ये कोरोना विषाणू आल्याने चैत्री यात्रा तसेच वर्षभरातील सर्वात मोठी असलेली आषाढी यात्रा, कार्तिकी यात्रादेखील रद्द करीत केवळ परंपरा जपत प्रतीकात्मक स्वरूपात साजरी करण्यात आली.

आषाढी यात्रेदरम्यान तीन वर्षांतून येणारा अधिक मास सोहळादेखील कोरोनामुळे रद्द करावा लागला. यामुळे साहजिकच मंदिर परिसरातील प्रासादिक साहित्य विक्रीची दुकाने बंद राहिली. लाडू प्रसादाची विक्री थांबवण्यात आली. श्री विठ्ठलाच्या अन्नक्षेत्रावरही परिणाम झाला होता.

लॉकडाऊनमध्ये 8 महिन्यांनंतर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कोरोनाचे नियम व अटी पाळत भाविकांना विठ्ठल मंदिरात केवळ मुख दर्शनाकरिता प्रवेश देण्यात येऊ लागला. येणार्‍या भाविकांना ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर पास दाखवल्यावरच मुख दर्शनाकरिता सोडले जात होते.

सध्या 20 जानेवारीपासून विनापास भाविकांना दर्शनाकरिता सोडले जात आहे. यामुळे 23 फेब्रुवारी रोजी माघी यात्रेचा सोहळादेखील परंपरागत साजरा होईल, अशी आशा भाविकांना आहे.

एका बाजूला कोरोनावरील लसीकरणाला देशभर सुरुवात झाली असताना अजूनही कोरोनाचे संकट संपले नसल्याने राज्य सरकारने 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. वारकरी संप्रदायाची माघी यात्रा 23 फेब्रुवारी रोजी होत असून कोरोनाच्या नियमांनुसार कोणत्याही यात्रा जत्रा भरवण्यास परवानगी नाही.

याबाबत मंदिर समितीची 2 फेब्रुवारी रोजी बैठक होत आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार असून शासनाच्या निर्देशानुसारच मंदिर समितीलाही यात्रेबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. यामुळे माघी यात्रा साजरी होण्यावर अनिश्चिततेचे सावट आहे.

वारकरी संप्रदायाची माघी यात्राही संचारबंदीमध्येच साजरी होण्याची शक्यता जास्त आहे. याबाबत राज्य सरकार काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण वैष्णवांचे लक्ष लागून राहिले आहे

सचिन सावंत मंगळवेढा
9370342750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *