BREAKING NEWS:
महाराष्ट्र

नागपूर (कामठी) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत 69,16 टक्के मतदान…

Summary

1  डिसेंबर रोजी  झालेल्या  नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीत कामठी शहर व ग्रामीण भाग मिळून एकूण  69 ,16 टक्के मतदान झाले असून 22 76 मतदारांपैकी 1574  महिला पुरुष पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला कामठी तालुक्यातील मतदान केंद्र क्रमांक 20 तहसील कार्यालयात […]

1  डिसेंबर रोजी  झालेल्या  नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीत कामठी शहर व ग्रामीण भाग मिळून एकूण  69 ,16 टक्के मतदान झाले असून 22 76 मतदारांपैकी 1574  महिला पुरुष पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला
कामठी तालुक्यातील मतदान केंद्र क्रमांक 20 तहसील कार्यालयात शहर भागातील 905 मतदार होते त्यापैकी 665 महिला पुरुष पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर  मतदान केंद्र क्रमांक 21 पंचायत समिती कामठी मतदान केंद्रावर ग्रामीण भागातील 851 मतदारा पैकी 589 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला  मतदानासाठी पहिल्यांदाच सकाळपासूनच सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदारांना मतदानासाठी लांब रांगा लावल्या होत्या कोराडी येथील मतदान केंद्र क्रमांक 18 विद्या मंदिर या केंद्रावर 210 मतदारांपैकी 131 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदान केंद्र क्रमांक 19 विद्या मंदिर कोराडी या मतदान केंद्रावर 310 मतदारांपैकी 189 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तालुक्यात 2276 मतदारा पैकी 1574 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून  तालुक्यात 69,16 टक्के मतदान झाले  मतदान केंद्र क्रमांक 21 कामठी पंचायत समिती या मतदान केंद्रावर रनाळा येथील कमलेश गणेश वडे  या तरुण पदवीधर मतदाराने आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे या धर्तीवर  लग्न असताना पूर्वी  मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावून लग्नाच्या तयारीत निघून गेला आज सकाळपासूनच काँग्रेस व भाजप कार्यकर्ते मतदारांना निवडणुकीचे पूर्वकल्पना देतांना आढळून आले
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *