नवीन पुलाचे बांधकाम त्वरित करून वाहतुकीस सुरू करण्यास कॉग्रेसचे धरणे आंदोलन
३१ मार्च २०२१ पर्यंत पुलाचे काम पुर्ण होईल – अभियंता बोरकर.
नागपूर (कन्हान) : – नदीवरील नवनिर्मित पुलाचे रेंगाळत अस लेले बांधकाम तातडीने पुर्ण करण्यात यावे याकरिता नागपुर जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा राजेंद्र मुळक च्या नेतृत्वात गांधी चौकाजवळ लक्षवेधी धरणे आंदो लन केल्याने राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांनी ३१ मार्च २०२१ पर्यंत पुलाचे बांध काम पुर्ण करून वाहतुकीसाठी मोकळा करण्यात येईल असे आश्वासन दिले.
काश्मीर ते कन्याकुमारीला जोडणा-या कन्हान नदीवर ब्रिटिशांनी १८७४ ला बांधलेल्या पुलावरून आ जही वाहतुक सुरू आहे. १४६ वर्षाचा कालावधी हो ऊनही सदर पुल अविरत सेवा देत आहे. या पुलाची झालेली जीर्ण अवस्था पाहून १९९४ ला तत्कालीन खा सदार मुकुल वासनिक यांच्या प्रयत्नाने युती सरकारने नवीन पुलाला मंजुरी दिली. ४६.४६ कोटी रुपये मंजूर करून तत्कालीन केंद्रीय सडक परिवहन मंत्री ऑस्कर फर्नाडिस यांच्या हस्ते पुलाचे भुमिपूजन करण्यात आ ले होते. या पुलाच्या बांधकामाचे कंत्राट खरे एण्ड तार कुंडे कंपनीला देण्यात आले. ३९० मिटर लांबी व दोन पदरी असलेला या पुलाचे बांधकाम दोन वर्षात पुर्ण होणे अपेक्षित होते. पण सहा वर्षे लोटुनही या पुलाचे बांधकाम रेंगाळत अद्याप पुर्ण झाले नाही. परिणामी जनतेत असंतोष खदखदत आहे. याचीच परिणिती म्हणुन सोमवार (दि २६) ला पुलाचे बांधकाम तातडीने करण्यात यावे यासाठी काँग्रेस पक्षा व्दारे मा. राजेंद्र मुळक माजी मंत्री व अध्यक्ष नागपुर जिल्हा ग्रामिण कॉग्रेस कमेटी यांचे अध्यक्षेत लक्षवेधी आंदोलन कर ण्यात आले. राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री नरेश बोरकर यांनी आंदोलन स्थळाला भेट देऊन ३१ मार्च २०२१ पर्यंत पुलाचे बांधकाम पुर्ण करून वाहतुकीसाठी मोकळा करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सदर काम काळमर्यादेत पुर्ण करावे अन्यथा याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी समज निवेदनाने अधिकारी व कत्राटदारा ला देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात मा. राजेंद्र मुळक माजी मंत्री व अध्यक्ष नागपुर जिल्हा ग्रामीण काँग्रेस,सौ.रश्मी बर्वे अध्यक्षा जि प नागपुर, गज्जु यादव महासचिव नाजिग्राकाँक, नरेश बर्वे, तक्ष शिलाताई वाघधरे, दयाराम भोयर, शॉजा शेख, राजेश यादव, सुधाकर उमाळे, श्यामकुमार बर्वे, पप्पु जामा, धनंजय सिंह, प्रंशात वा़घमारे, गणेश माहोरे, योगेंद्र रंगारी, मनीष भिवगडे, रीता बर्वे, रेखा टोहणे, कल्पना नितनवरे, गुंफा तिडके, पुष्पा कावडकर, छायाताई रंग, अमोल प्रसाद, सतीश भसारकर, अजमल हुसैन चाँद, ड़ोमाजी चकोले, रवींद्र रंग, सतिश पाली, प्रकाश चाप ले, दाष्रिथ पाटील, शक्ती पात्रे, रणवीर यादव, गौतम नितनवरे, अमर पात्रे, सिद्धार्थ ढोके, मधुकर गणवीर, राजा यादव, आकीब सिद्दीक़ी, इमरान शेख, आकाश कडु , अरुण पोटभरे, कुशल पोटभरे, निखिल तांडेकर, शक्ति सिंह, अनिकेत निंबोने, अजय कापसीकर, गणेश भालेकर, विक्की खडसे, विक्की उके, दिनेश नारनवरे, शेखर बोरकर, पंकज गजभिये, दिपक तिवाडे, पंकज बागडे, संदिप सहारे, शाखिभ शेख, रमेश चव्हाण, रण जित सिंग, मेघराज लुंडोरे, विनोद येलमुले, अजमल हुसेन, सद्रे आलम, पंकज गजभिये, नितेश यादव, रमे श चव्हाण, अनिल विश्वकर्मा, आसिफ सिद्दीकी, प्रदीप बावणे, रामचंद्र कुशवाहा सह कॉग्रेस पदाधिकारी, का र्यकर्ते उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
9579998535