महाराष्ट्र

थकीत मालमत्ता कर आणि पाणी बिला वरील व्याज होणार माफ..

Summary

नागपूर : १५ – नागपूर मनपाची अभय योजना : १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी २०२१ चा कालावधी. योजनेबद्दल विस्तृत माहिती देताना ज विजय (पिंटू) झलके यांनी सांगितले, मागील अनेक वर्षांपासून कर न भरणा-या थकीत कर धारकांच्या सुविधेसाठी मनपातर्फे लागू करण्यात […]

नागपूर : १५ – नागपूर मनपाची अभय योजना : १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी २०२१ चा कालावधी.
योजनेबद्दल विस्तृत माहिती देताना ज विजय (पिंटू) झलके यांनी सांगितले, मागील अनेक वर्षांपासून कर न भरणा-या थकीत कर धारकांच्या सुविधेसाठी मनपातर्फे लागू करण्यात आलेल्या अभय योजनेमुळे मालमत्ता कर धारकांना ८० आणि ५० टक्के शास्ती माफीचा लाभ मिळणार आहे. ‘अभय योजने’चा कालावधी १५ डिसेंबर २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ असा राहील. या योजनेअंतर्गत ३१ मार्च २०२० पर्यंत थकीत कर असणाऱ्या तसेच चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत न भरल्यास चालू आर्थिक वर्षाकरिता थकबाकीदार होणा-या करदात्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. दोन महिन्याचा मोठा कालावधी या योजनेसाठी देण्यात आला आहे. पहिल्या महिन्यात म्हणजे १५ डिसेंबर २०२० ते १४ जानेवारी २०२१ या कालावधीमध्ये थकीत कर भरणा-यांना ८० टक्के शास्ती माफीचा लाभ घेता येईल. तर १५ जानेवारी २०२१ ते १४ फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये कर भरणा-यांचे ५० टक्के शास्ती माफ होईल, अशीही माहिती स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिली.

सुलभ ऑनलाईन प्रक्रिया
योजनेच्या अंमलबजावणीबाबत माहिती देताना आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले की, ‘अभय योजना’ संपूर्ण नागपूर शहरामध्ये यशस्वीरित्या लागू करण्याबाबत मनपा प्रशासन सज्ज आहे. शहरातील प्रत्येक झोन कार्यालयामध्ये प्रत्येकी दोन कर भरणा केंद्र सुरू करण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीने अगदी सहजपणे नागरिकांना कर भरता येणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून काही मिनिटातच आपल्याला कर भरणा करता येणार आहे. यासाठी कुठल्याही प्रकारचे बँक शुल्क आकारण्यात येत नाही. याशिवाय नियमित कर भरणा करणा-यांना त्यांच्या करामध्ये ४ टक्के सवलत देण्याची योजना सुरूच राहणार आहे, असेही आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले.

प्रसाद काठीकर
प्रतिनिधि,नागपूर
पोलिस योद्धा न्यूज़

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *