तासगाव तालुक्यातील 36 गावात काट्याची लढतीत काही गावात दुरंगी तर काही गावात तिरंगी लढत.गाव निहाय झालेले एकूण मतदान…
राजू थोरात तासगाव प्रतिनिधी
तासगाव तालुक्यामध्ये 39 ग्रामपंचायती पैकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामध्ये नरसेवाडी लोकरेवाडी व कौलगे या गावांचा समावेश आहे तर 36 गावांमध्ये निवडणुकीत काट्याच्या लढती झाल्या काही गावांमध्ये दुरंगी तर काही गावांमध्ये तिरंगी अशा लढती पाहायला मिळाल्या.
मांजर्डे गावामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना होता तर सावळजमध्ये राष्ट्रवादीमध्ये दोन पँनल उभा केले होते.त्यांच्या विरुद्ध भाजप असा मुकाबला झाला.
कवठेएकंद मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षाने स्वतंत्र पॅनल उभा केले होते तर भाजप शेकाप यांनी एकत्र येत पँनल उभा केले होते.
तासगाव तालुक्यातील 36 गावांमध्ये शांततेत मतदान पार पडले. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
कंसात एकूण झालेले मतदान
आळते 1717 (1418)
बोरगाव 4079 (3146)
ढवळी 2325 (1917)
हातनोली 2289 (1794)
जुळेवाडी 1680 (1331)
कवठेएकंद 7784 (6335)
धामणी 1216 (894)
निंबळक 1376 (1126)
राजापूर 3100(2576)
शिरगाव 2256(1807)
तूरची 4362(3715)
विसापूर 4845(3426)
येळावी 8273(6760)
धोंडेवाडी 301(257)
धुळगाव 1935 (1627)
डोरली 821(705)
गोटेवाडी 1233(1073)
हातनूर 4109(3232)
लोढे 928(778)
मांजर्डे 6306(5026)
मोराळे 706,(578)
नागाव1934,(1678)
पाडळी 1204,(902)
विजयनगर 906,(723)
दहिवडी 2009,(1616)
डोंगरसोनी 1806,(1478)
गौरगाव 1602,(1312)
गव्हाण 3271,(2601)
जरंडी 2315,(1888)
पेड 4863,(3646)
सावळज 7786(5858)
सिद्धेवाडी 1696,(1252)
वज्रचौंडे 972(827)
वडगाव 2063(1727)
वाघापूर 975(824)
यमगरवाडी 905(724)
एकूण 95953 मतदार होते
त्यापैकी 76 हजार 577 मतदारांनी मतदान केले
तालुक्यातील मतदान एकूण 76.81% झाले आहे अशी माहिती निवडणूक नियंत्रण अधिकारी तथा कल्पना ढवळे यांनी दिली आहे.
पोलीस उपाधीक्षका अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार,नितीन केराम, पोलीस उपनिरीक्षक विश्राम मदने ,रत्नदीप साळोखे, विठ्ठल शेळके यांच्यासह सांगली पोलिस मुख्यालय व तासगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. 36 गावात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही त्यामुळे पोलिसांचेही कौतुक होत आहे.