BREAKING NEWS:
महाराष्ट्र

टी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस ! कोविड लसीकरण मोहिमेस प्रारंभ मोदींकडून शास्त्रज्ञांचे कौतूक ; पहिल्या टप्प्यात तीन कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस !

Summary

जगातील सर्वांत मोठ्या कोविड लसीकरण मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला . या कामगिरीबद्दल देशाचे आणि देशातील शास्त्रज्ञांचे अभिनंदन त्यांनी यावेळी केले .लस विकसित करण्यास वर्षानुवर्षे लागतात . परंतु अगदी कमी कालावधीत भारतात आपल्याकडे केवळ दोनच नव्हे […]

जगातील सर्वांत मोठ्या कोविड लसीकरण मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला . या कामगिरीबद्दल देशाचे आणि देशातील शास्त्रज्ञांचे अभिनंदन त्यांनी यावेळी केले .लस विकसित करण्यास वर्षानुवर्षे लागतात . परंतु अगदी कमी कालावधीत भारतात आपल्याकडे केवळ दोनच नव्हे तर स्वनिर्मित दोन लस आहेत , असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले .

जगात असे काही देश आहेत ज्यांची लोक संख्याही ३ कोटी एवढी नाही . परंतु भारत पहिल्या टप्प्यात ३ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणार आहे . पुढच्या टप्प्यात आम्ही ही संख्या ३० कोटींवर नेणार आहोत . जगभरात भारत , अमेरिका आणि चीन हे मोठ्या लोकसंख्येचे देश असून भारतात सर्वांत मोठी लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले . भारतात तयार केलेल्या लसींबाबत भीती दूर करीत पंतप्रधान मोदी म्हणाले की , वैज्ञानिक संक्षेत्रात भारताने विश्वासार्हता प्राप्त केली आहे .

जगभरातील मुलांना दिलेल्या सुमारे साठ टक्के लसी भारतात तयार होतात . जग भारताच्या लस विज्ञान आणि संशोधनावर विश्वास ठेवत आहे , असेही ते म्हणाले . भारतात तयार झालेल्या लसी किफायतशीर आणि वापरण्यास सोप्या आहेत . विदेशातील काही लसींची किंमत तब्बल पाच हजार डॉलरपेक्षा अधिक आहे आणि त्या उणे ७० अंश सेल्सिअस तापमानात साठवाव्या लागतात , याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले .

पंतप्रधान मोदी म्हणाले , मी समस्त देशवासियांना या गोष्टीची पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छित आहे की , कोरोना वॅक्सिनचे दोन डोस घेणे अत्यंत आवश्यक आहे . पहिला डोस घेतला व नंतरचा डोस घेणे विसरले , अशी चूक करू नका . पहिल्या व दुसऱ्या डोसमध्ये जवळपास एक महिनाचे अंतर ठेवले जाईल . तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे आहे की , दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवड्यानंतरच तुमच्या शरिरात कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठीची आवश्यक प्रतिकारशक्ती निर्माण होईल . त्यामुळे लसीकरण होताच तुम्ही बेजबाबदारपणे वागायला लागला , मास्क काढून ठेवणे , सुरक्षित अंतर ठेवणे विसरलात तर काही उपयोग होणार नाही .

मी विनंती करतो की असे काही करू नका . तसेच , मी तुम्हाला आणखी एक गोष्ट अत्यंत आग्रहाने सांगू इच्छित आहे की , ज्या प्रकारे धैर्याने तुम्ही कोरोनाशी लढलात . तसेच , धैर्य आता लसीकरणाच्यावेळी देखील दाखवायचे आहे असे आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी देशवासियांना केले . मोदी पुढे म्हणाले , आज भारत लसीकरण मोहिम सुरू करत आहे . यानिमित्ताने मी त्या दिवसांचेही स्मरण करत आहे . कोरोना संकटाचा तो काळ , जेव्हा प्रत्येकाला वाटत होते की काहीतरी करू . सामान्यतः आजारपणात पूर्ण कुटुंबच आजारी व्यक्तीसाठी एकत्र येते .

पण या आजाराने रुग्णालाच एकटे करून टाकले . अनेक ठिकाणी छोट्या बालकांना आईपासून दूर रहावे लागले . आई त्रस्त व्हायची , रडायची . . पण काही करू शकत नव्हती . मुलाला कुशीत घेऊ शकत नव्हती . वयोवृध्द पालक रुग्णालयात एकटेच संघर्ष करत होते . मुले इच्छा असूनही जवळ जाऊ शकत नव्हते . जे आपल्याला सोडून गेले , त्यांना परंपरेनुसार तो निरोपही मिळाला नाही असे बोलताना पंतप्रधान मोदींना गहिवरून आले . दाटलेल्या कंठानेच त्यांनी पुन्हा बोलायला सुरूवात केली . त्यावेळचा विचार केला तर अंगावर शहारे येतात . उदास वाटू लागते . पण संकटाच्या त्याच काळात , निराशेच्या त्या काळात कुणीतरी आशा पेरत होते . आपल्याला वाचवण्यासाठी आपले प्राण संकटात टाकत होते .

आपले डॉक्टर , नर्स , पॅरामेडिकल स्टाफ , सफाई कामगार , पोलिस यांनी मानवतेसाठी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले . कित्येक दिवस घरीही गेले नाही . शेकडो सहकारी असेही आहेत जे पुन्हा घरी परत आलेच नाहीत . त्यांनी एका – एका जीवाला वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली . त्यामुळे आज कोरोनाचा पहिला डोस आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना देऊन समाज कृतज्ञता व्यक्त करत आहे . मानवाच्या इतिहासात अनेक संकट , महामाऱ्या आल्या . संकट आली . पण , कोरोनासारख्या संकटाची कुणीही कल्पना केली नव्हती . याचा अनुभव विज्ञानालाही नव्हता अन् समाजालाही , असे म्हणताना मोदींचे डोळे भरून आले .

सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *